Fadanvis यांचे स्वप्न पूर्ण होणार, ‘या’ दिवशी सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Budget session) तारीख जाहीर झाली आहे. विधीमंडळाचे सन 2023 साठीचे अधिवेशन सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीपासून पासून विधान भवन, मुंबई ( Mumbai ) येथे सुरु होणार आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. अधिवेशनात राज्याचा वर्ष 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवार दि. 9 मार्च 2023 रोजी मांडला जाणार आहे. त्या अगोदर 8 तारखेला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. यावेळच्या अर्थसंकल्पासाठी फडणवीसांनी सामान्य नागरिकांकडून सूचना मागावल्या आहेत. त्यासाठी सरकारने एक लिंक देखील जारी केली आहे.
या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. फडणवीस यांना 2014 साली अर्थखाते हवे होते. पण ते स्वत: मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्याकडे अर्थखाते येऊ शकले नाही. ती संधी फडणवीसांना आता मिळाली आहे. फडणवीसांचा अर्थसंकल्पाचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी ‘अर्थसंकल्पा कसा वाचावा’ हे पुस्तकही लिहले आहे. फडणवीस हे 2014 पूर्वी विरोधात असताना जयंत पाटील यांच्याकडून अर्थसंकल्प कसा सादर करायचा या विषयावर मार्गदर्शन देखील घेतले होते.
दरम्यान राज्यात अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विधान परिषेदत अर्थसंकल्प कोण सादर करणार याविषयी प्रश्नचिन्ह आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री होते. तर दीपक केसरकर व शंभूराजे देसाई यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात मंत्रीमडळ विस्तार होण्याची देखील शक्यता आहे.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी हा किमान 5 आठवड्यांचा असावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा काही वाढवण्यात आला नव्हता, किमान यावेळी तरी अधिवेशन जास्त दिवसांचे घ्यावे, असे मागणी पवारांनी केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही मोठ्या घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. कारण आगामी काळात मुंबई महापालिकेसह अनेक मोठ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होणार आहेत. एकंदरीतच या अर्थसंकल्पामधून राज्यातील जनतेला काय मिळणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.