Farm Loan Waiver Second List : कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, 3 लाख 55 हजार शेतकऱ्यांना दिलासा

Farm Loan Waiver Second List : राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Farm Loan Waiver Second List

Farm Loan Waiver Second List : राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली असून या यादीत 3 लाख 55 हजार 614 शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. 11 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या या यादीनंतर पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे आवाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे (Deepak Tavare) यांंनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या यादीत जिल्हा मध्यवर्ती बँकांचे 41 हजार, व्यापारी बँकांचे 3 लाख 14 हजार असे एकूण 3 लाख 55 हजार शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. याद्या (Farm Loan Waiver Second List) बँका शाखा तसेच ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आले असून या याद्यामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत कर्जबाकी असलेल्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे तर 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज माफ करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे.

2 लाखांपेक्षा जास्त कर्ज रक्कम देखील माफ होणार

‘हेअरकट’ धोरणानुसार (Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme) पात्र रक्कम निश्चित करण्यात आली असल्याने कर्जाची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असली तरी माफ होणार असल्याची माहिती देखील राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांंनी दिली आहे. तसेच राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत काही शेतकऱ्यांचे नाव नसेल तर काळजी करु नये कारण पुढील आठ ते दहा दिवसात तिसरी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देखील दीपक तावरे यांनी दिली आहे. याच बरोबर ज्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत त्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

विभागनिहाय लाभार्थी शेतकरी

छत्रपती संभाजीनगर — 1,95,899
अमरावती — 71,796
नागपूर — 34,520
नाशिक — 25,471
पुणे — 23,117
कोकण — 4,811

ED ची धाड अन् माजी मुख्यमंत्र्यांनी दिला काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा-

यादीत नाव कसे तपासाल?

बँक शाखेत यादी उपलब्ध
ग्रामपंचायतीमध्येही यादी लावण्यात येणार
यादीत आपले नाव तपासा
31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी तपासा

follow us