Kisan Long March : शेतकऱ्यांचा मोर्चा शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; सावे अन् भुसे घेणार भेट
Thane : शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने येतो आहे. आंदोलनकर्त्यांच्या शेतकऱ्यांसाठी काही मागण्या आहेत. सध्या हा मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्याअगोदर राज्याचे मंत्री दादा भुसे व अतुल सावे हे शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत व त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. याबाबत मंत्री दादा भुसे व अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली आहे. शेतकरी नेते जे पी गावित यांंनी हा मोर्चा काढला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांसोबत बैठक होणार आहे. याबैठकीत शेतकरी व सचिव देखील उपस्थित राहणार आहेत, असे दादा भुसे म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या एकुण १४ मागण्या आहेत. त्यातील काही मागण्या या राज्य पातळीवरील आहे, त्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भुसेंनी सांगितले आहे.
या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी मी व मंत्री अतुल सावे आम्ही दोघे त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहोत. जेपी गावित यांचे म्हणणे होते की शासनाच्या प्रतिनिधींनी आमची भेट घेतली पाहिजे. त्यानुसार आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. यानंतर त्यांचे शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल होईल, असे भुसे म्हणाले आहेत.
Devendra Fadnvis : शेतकऱ्यांना रुपयांत पीकविमा दिला तर पोटात का दुखतंय?
सध्या हा मोर्चा नाशिकच्या पुढे कसाला घाट ओलांडून पुढे आला आहे. पुढच्या २ ते अडीच तासांमध्ये आम्ही त्यांची भेट घेणार आहोत, असे ते म्हणाले आहेत. कांद्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा ही त्यांची पहिली मागणी आहे. त्यासंदर्भात शासनाने काही निर्णय घेतला आहे, अशी माहिती दादा भुसेंनी दिली आहे.