Uddhav Thackeray : पंचामृत म्हणजे आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही; काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यांवर टाका
Uddhav Thackeray : “राज्य सरकारने यावेळी अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पाला गोड नावं दिल, पंचामृत. पंचामृत या शब्दाचा अर्थच असा आहे की आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही.” अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे विधिमंडळ आवारात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अर्थसंकल्प, शेतकरी मोर्चा आणि जुनी पेन्शन योजना यावरून त्यांनी सरकारवर टीका केली.
यावेळी अर्थसंकल्पावरून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की राज्य सरकारने यावेळी अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पाला गोड नावं दिल, पंचामृत. पंचामृत या शब्दाचा अर्थच असा आहे की आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही. त्यामुळे तुमच्या हातात पडेल तेवढे घ्या आणि डोक्यावरून हात फिरवा. अशी या सरकारची परिस्थिती आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
Balloon Dilation : एम्सच्या डॉक्टरांचा चमत्कार! गर्भातील बाळावर केली यशस्वी सर्जरी
काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यावर उडवायला हरकत नाही
यावेळी राज्यात सुरु असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरून देखील त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्याच्या मागणी सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात.
याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले की या सरकारच्या पाठीमागे जगातील सर्वात मोठी महाशक्ती आहे. त्यामुळे हे सरकारने याचं ओझं पेललं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचा मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. खरंतर, पंचामृत अर्थसंकल्पातील काही थेंब सरकारने सरकारी कर्मचाऱ्यावर उडवायला काही हरकत नाही. असा खोचक टोला त्यांनी यावर लगावला.
शेतकऱ्यांसाठी सरकारकडे वेळ नाही
सध्या नाशिक येथून शेतकऱ्यांच्या मोर्चा निघाला आहे. मागच्या वेळीदेखील असा मोर्चा आला होता, पण त्यावेळी शिवसेना नेते सामोरे गेले होते. स्वतः आदित्य ठाकरे देखील त्यांना भेटले होते, त्यांची विचारपूस केली होती. आजही नाशिक मधील स्थानिक नेते त्यांना भेटले आहेत. पण अन्नदाता आक्रोश करत असताना सरकाराला मात्र त्यांच्याशी चर्चा करायाला वेळ मिळत नाही, आज-उद्या म्हणत ते शेतकऱ्यांना टाळत असल्याची टीका त्यांनी केली.