आजपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत

आजपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत

मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढल्यामुळे उन्हाच्या झळा (Summer Heat) चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (India Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून आठ मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

देशाच्या वायव्य दिशेकडून बंगालच्या उपसागरात वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या वातावरणीय घडामोडी घडण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. सध्या हवामान विभागाकडून चार ते सहा मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामनुसार, प्रत्यक्षात सोमवार दिनांक 6 मार्च संध्याकाळपासून ते बुधवार दिनांक 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, पाऊस किती होतो, त्यापेक्षा पाऊस कशा पद्धतीचा होतो, यावर शेतीपिकांचे नुकसान अवलंबून आहे. कारण पावसाबरोबर तूरळक ठिकाणी कदाचित गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. पाऊस जरी 2 ते 10 मिमी असला तरी त्याचबरोबर वाराही ताशी 20 ते 25 किमी वेगाचा असू शकतो. हा वाराच कदाचित जास्त फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान करण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून टाकावी, राणेंचे फडणवीसांना पत्र

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस सुरू होण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे करून घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube