Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, नऊ जणांचा मृत्यू

Untitled Design (70)

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जवळील रेपोली गावाजळ ट्रक आणि कारचा भीषण झालाय. या अपघातात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलं नाही.

अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. भीषण अपघातामुळं काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.

रायगडजवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि भीषण अपघात झालाय. या अपघातात आत्तापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

प्रत्यक्षदर्शींनी माहितीनुसार कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातात कारचा चक्काचूर झालाय. तर गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झालाय.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि अपघात झालाय. या अपघातात कारमधील सर्वच्या सर्व नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात 5 महिन्यांचं बाळ बचावल्याची माहिती मिळतेय.

Tags

follow us