Video: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर पोलिसांची प्रतिक्रिया; तपास करण्याबद्दल दिली माहिती
Attack on Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (Anil Deshmukh) या हल्ल्यानंतर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देताना सांगितलं की, काल सोमवार रात्री ८ वाजता अनिल देशमुख यांची गाडी नरखेडपासून परत येत असताना गाडीवर दगडफेक झाली. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आमचा तपास सुरू आहे.
मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी; प्रचारावरून परतत असताना कारवर दगडफेक
या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावलं आहे. मी स्वतः घटनास्थळाचा दौरा केला असून तपासावर देखरेख करत आहे. आताच काही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. या घटनेतील तथ्य आम्ही लवकरच समोर आणू. दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रात्री नागपूरच्या अलेक्सिस (मॅक्स) रुग्णालयात आणलं गेलं आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदाने यांनी सांगितलं की, आम्ही रुग्णालय परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.
सलील देशमुख काय म्हणाले?
अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी काटोलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. भाजपा प्रत्येक ठिकाणी वाईट पद्धतीने पराभूत होत आहे. त्यामुळेच अशा पद्धतीने हल्ला करून ते लोक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात आवाज उचलणाऱ्यांचं डोके फोडले जाईल, असा संदेश यातून दिला जात आहे. काटोल, नरखेडमध्ये अशांतता पसरवण्याचाच हा प्रकार आहे, असाही आरोप सलील देशमुख यांनी केला.
भाजपची टीका
अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. भाजपने ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप केला. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपचे काटोल मतदार संघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. काटोलमध्ये सलील देशमुख यांच्याविरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्यात अटीतटीची लढत आहे.
#WATCH | Maharashtra | SP – Nagpur Rural, Harsh Poddar says, "Today, around 8 PM, an incident took place in Katol assembly constituency. Anil Deshmukh was coming from Narkhed towards Katol after completing his meeting. According to the primary information, stones were pelted on… https://t.co/dxwAqMpwYM pic.twitter.com/XdlZCcPdyg
— ANI (@ANI) November 18, 2024