Anil Deshmukh : भाजपचा दबाव पण मी समझोता…; पवारांच्या विधानाला दुजोरा देत देशमुखांचा गौप्यस्फोट

Anil Deshmukh : भाजपचा दबाव पण मी समझोता…; पवारांच्या विधानाला दुजोरा देत देशमुखांचा गौप्यस्फोट

Anil Deshmukh : माझ्यावरही भाजपचा दबाव होता. त्यांच्या काही नेत्यांनी तसा प्रयत्न केला होता. पण मी समझोता करायला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दुसऱ्याच दिवसी माझ्यावर छापा टाकण्यात आला. तसेच परमबीर सिंहांना माझ्यावर खोटे आरोप करायला सांगण्यात आले आणि माझ्यावर कारवाई केली. जर मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई केली नसती. असं म्हणत अनिल देशमुखांनी गौप्यस्फोट केला आहे.

Vivek Agnihotri: ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल सवाल करताच अग्निहोत्रींचा काढता पाय; Video Viral…

काय म्हणाले अनिल देशमुख?

आमच्यातील काही लोक ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले असं विधान रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पवारांच्या त्याच विधानाला दुजोरा देत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, माझ्यावरही भाजपचा दबाव होता. त्यांच्या काही नेत्यांनी तसा प्रयत्न केला होता. पण मी समझोता करायला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी माझ्यावर छापा टाकण्यात आला. तसेच परमबीर सिंहांना माझ्यावर खोटे आरोप करायला सांगण्यात आले आणि माझ्यावर कारवाई केली. जर मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई केली नसती. असं म्हणत अनिल देशमुखांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबईतील ‘INDIA’ च्या बैठकीत ‘आप’ सहभागी होणार? अरविंद केजरीवालांनी स्पष्ट सांगितले

काय म्हणाले होते शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करीत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्यातल्या आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले होते की, देशातल्या विविध राज्यांत विरोधी पक्षाचे नेते भाजपसोबत जात सत्ता स्थापन करत असल्याची परिस्थिती आहे. सध्या काही नेते भाजपसोबत जात आहेत. ईडी चौकशी लागताच काही लोकं भाजपसोबत जात असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, तसेच सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम सुरु आहे. सत्तेचा गैरवापर होत असून विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे ईडी लावल्यानेच ते लोकं भाजपसोबत जात असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube