पडळकर अन् आव्हाडांना विधानभवन लॉबीतील हाणामारी भोवणार; चौकशी समितीची कार्यकर्त्यांना तुरूंगवासाची शिफारस
Padalkar and Awhad activists यांना विधानभवन लॉबीतील हाणामारी संदर्भात तुरूंगवासाची शिक्षा करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे.
Fight in Vidhan Bhavan lobby Inquiry committee recommends imprisonment for Padalkar and Awhad activists : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळाचं मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन झालं होतं. त्यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवन लॉबीमध्येच हाणामारी झाली होती.
ड्रोनने सर्व्हे अन् शेतातील 5 लाखांचा गांजा जप्त; भोकरदन पोलिसांची मोठी कारवाई
त्यानंतर राज्यातील राजकारणातून यावर राजकीय संस्कृती बिघडल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर याबाबत एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आता एक शिफारस केली आहे.या हाणामारी संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल आला आहे. त्यामध्ये शिफारस केली आहे की, विधान भवन लॉबीमध्ये हाणामारी करणारे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिक्षा केली जावी.
