गौतमी पाटील म्हणाली… मी चूकत नाही, मागे जे झालं…

गौतमी पाटील म्हणाली… मी चूकत नाही, मागे जे झालं…

पुणे : माझ काही चूकत नाही. मागे जे काही झालं त्याबद्दल मा माफी मागितली आहे. तसेच माझे नृत्य आणि पोशाख अश्लील नसतात माझ्या साडीचा पदर, केस बांधलेले असतात. मी काही चुकत नाही त्यामुळे माझ्या शोला बंदी घातली जाऊ शकत नाही. गर्दीबद्दल सांगायचं तर माझ्या कार्यक्रमाला गर्दी होते. लोकांना माझी कला पाहायला आवडते म्हणून लोक येतात. अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील या लावणी कलाकारने दिली आहे.

लावणीच्या नावावर गौतमी पाटील ही अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे पोलिस आयोजकांसह तिच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. तर काही जुन्या लावणी कलावतांनी गौतमी पाटील हिच्यावर आक्षेप घेतला आहे. तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

नुकतचं गौतमी पाटीलने एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. गौतमीने पहिल्यांदाच अशी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तीने आपल्यावर होत असलेल्या आरोपांचं खंडन करत मी काही चुकीचं करत नसल्याने मला काही माझी कला थांबवण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया तीने यावेळी दिली. रेल्या काही दिवसांपूर्वी आता शाहीर, नवयान महाजलसाचे सचिन माळी यांनी गौतमी पाटील हिचा बाजू घेतली होती. गौतमी पाटील गुन्हा काय असा प्रश्न सत्यशोधक सचिन माळी यांनी उपस्थित केला. तसेच गौतमी पाटीलवर आक्षेप घेणाऱ्यांचे कानही माळी यांनी टोचले होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube