राज्यपाल नियुक्त १२ आमदार प्रकरण : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळणार?

  • Written By: Published:
राज्यपाल नियुक्त १२ आमदार प्रकरण : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळणार?

राज्याचा सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल बाकी असला तरी राज्याच्या राजकारणातील आणखी एका महत्वाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयाकडे राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. कोर्टात राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यापासून म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण घडलेलं पाहायला मिळालं आहे. राज्यात महविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची राज्य सरकारने शिफारस केल्यानंतरही नेमणूक केली आहे. त्यावरुन मोठा वादही पाहायला मिळाला होता.

Heat Stroke : श्रीसदस्यांची विचारपूससाठी राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाणार

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर नव्या सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदार नेमणून करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी न्यायालय आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

राज्यच्या विधान परिषदेत एकूण सदस्यसंख्या ही 78 इतकी आहे. यापैकी 12 जागा या राज्यपाल नियुक्त असतात. या 12 जागांवर विविध क्षेत्रातील दिग्गजांना राज्यपालांकडून संधी दिली जाते. त्यासाठी राज्य सरकार सदस्यांची नावं सूचवतं आणि त्याबाबतचा प्रस्ताव पाठवतं. पण महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली 12 नावे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूर केली नाहीत.

ठाकरे-पवारांसमोरच जयंत पाटलांचे सूचक विधान! म्हणाले… कुछ तो मजबुरीया…!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube