पुणे, मुंबई अन् कोकण कृषी विद्यापीठाला मिळाले नवीन कुलगुरु; कोण आहेत, वाचा सविस्तर

Governor, Chancellor Ramesh Bais announced the appointment of Vice-Chancellors for Mumbai, pune and konkan University

मुंबई : मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कोकण कृषी विद्यापीठाला अखेरीस नवीन कुलगुरु मिळाले आहेत. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, तर डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय डॉ. संजय भावे यांची कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Governor, Chancellor Ramesh Bais announced the appointment of Vice-Chancellors for Mumbai, pune and konkan University)

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी संपला होता. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिंगबर शिर्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपव‍िण्यात आला होता. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ दिनांक 18 मे 2022 रोजी संपला होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांचेकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून पुणे आणि मुंबई विद्यापीठातील कुलगुरुंचे पद रिक्त होते.

अखेरीस आज (सोमवारी) राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी तिन्ही कुलगुरुंच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

मुंबई विद्यापीठासाठी करण्यात आली होती 5 नावांची शिफारस :

  • प्रा. रवींद्र कुलकर्णी – मुंबई विद्यापीठाची माजी प्र. कुलगुरू म्हणून यांनी काम केलं आहे.
  • सुरेश गोसावी – भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
  • तेज प्रताप सिंग – बीएचयु (बनारस हिंदू विद्यापीठ), राज्यशास्त्राचे प्राध्यापक
  • ज्योती जाधव – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट
  • अर्चना शर्मा – भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर

पुणे विद्यापीठ कुलगुरुंच्या शर्यतीत होती 5 नाव :

डॉ. पराग काळकर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता

प्रा. अविनाश कुंभार – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रसायनशास्त्र विभाग

डॉ.संजय ढोले – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भौतिकशास्त्र विभाग

प्रा. सुरेश गोसावी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,  पर्यावरण शास्त्र विभाग

डॉ. विजय फुलारी – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, भौतिकशास्त्र विभाग

Tags

follow us