Sharad Pawar : पुण्यात शरद पवारांबरोबर फोटो काढण्यासाठी आजींचा हट्ट

Sharad Pawar : पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी एका आजींनी हट्ट केला. यावेळी मला एक शरद पवारांसोबत फोटो काढायचा आहे असं आजी म्हणाल्या. आजींचा हट्ट पाहून शरद पवार यांनी त्यांना स्टेजवर येण्यास सांगितले आणि त्यांच्याबरोबर फोटो काढला. यानंतर आजींने वालचंदनगरचा एक भन्नाट किस्सा देखील सांगितला.
आजी म्हणाल्या की, 1976 साली वालचंदनगर येथे आमचे वडील युनियनचे लीडर होते. तेव्हा शंकरराव बाजीराव पाटील आणि शरद पवार आमच्याकडे येत होते. तेव्हा मी त्यांना आमच्या वरांड्यात बसण्यासाठी सतरंजी टाकत होती. शरद पवार दिसायला खूप छान होते आणि आमच्याबरोबर खूप प्रेमाने बोलायचे असं आजी म्हणाल्या. तर दुसरीकडे या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम साखर व्यवसायातील व्यक्तीचा सन्मान आहे. पूर्ण आयुष कामगार चळवळीत घालवले. अहिल्यानगर जिल्हा जुन्या काळात गाजलेला जिल्हा होता. साखर चळवळ सुरू झाली, सहकार आणि खाजगी असे अनेक साखर कारखाने होते. कामगार हिताचा प्रश्न आला की, नेतृत्व उभे राहिले. त्यात साथी किशोर पवार यांचे नाव पुढे येते. माझ्या आयुष्यातील सर्वात पाहिला मोर्चा प्रवरानगरमध्ये काढला, कारखाना बंद करायला सांगायला गेलो. आमच्यावर लाटी हल्ला झाला. त्यात आम्हाला पण लाट्या पडल्या, लाट्या पडल्यावर काय होत तुम्ही सगळे चळवळीतील आहेत, तुम्हाला माहिती आहे. असं शरद पवार म्हणाले.
Bob Simpson Passed Away : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार बॉब सिम्पसन यांचे 89 व्या वर्षी निधन
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आजपर्यंत मी नेहमी कामगार आणि सरकार यांच्यामध्ये मध्यस्थी भूमिका घेतली. साखर कामगार आजपर्यंत संघर्ष करत आले, त्यांचे अनेक प्रश्न सोडवले. आज देशात साखर व्यवसाय महत्वाचा आहे. एकवेळ राज्यात कापड गिरणी होत्या, मुंबईमध्ये अनेक गिरणी होत्या, 200 गिरण्या होत्या. आज एकच राहिलेली आहे. यात चळवळ महत्वाची भूमिका होती. आज वाईट वाटते. आज गिरणी मुंबईत दिसत नाहीत. माणसे नाहीत, चाळीस पन्नास मजली इमारती दिसतात. त्या ठिकाणी पण मराठी माणूस कुठेच दिसत नाही.आज कामगार पिळवणूक होत असेल, तर विचार करावे लागेल. असेही यावेळी शरद पवार म्हणाले.