एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी; अंबानी मध्ये पडले नसते तर नाईक, शिंदे गट अन् भाजपमध्ये कलगीतुरा

Vijay Chaughule on Ganesh Naik : आमच्या अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे आहेत (Naik) म्हणून मी हा टी शर्ट घातला आहे. अनाथांचा नाथ एकनाथ. आम्ही 12 महिने निवडणुकीला तयार असतो, त्यामुळं यंदा हंडीवर पालिका निवडणुकीची छाप आहे असं म्हणता येणार नसल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनी केलं.
गणेश नाईक म्हणाले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्हाला पालकमंत्री पदाची लॉटरी मुकेश अंबानीमुळं लागली. मुकेश अंबानी मध्ये पडले नसते तर त्यांना पालकमंत्रीपद मिळाल नसतं, अशी टीका विजय चौगुले यांनी केली. यंदाच्या निवडणुकी आमची पालिकेत असणारी ताकद दाखवून देऊ असंही विडय चौगुले म्हणाले.
Sharad Pawar : पुण्यात शरद पवारांबरोबर फोटो काढण्यासाठी आजींचा हट्ट
गणेश नाईक यांचं वय झालं आहे, त्यामुळे ते आम्हाला लॉटरी लागली म्हणत असतील. परंतू, एकनाथ शिंदे यांना कधीही लॉटरी लागली नाही. त्यांनी मेहनतीने सगळं मिळवल्याच वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलं. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागल्याचे वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर नरेश म्हस्के यांनी आल पलटवार केला आहे. 40 जणांना सोबत घेऊन जाण्याची हिंमत केवळ एकनाथ शिंदे यांच्यातच आहे. गणेश नाईक यांचं वय झालं आहे त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचे म्हस्के म्हणाले. तसंच, नवी मुंबईत वातावरण बदललं आहे. आगामी पालिका निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत.
समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील आमच्याशी संपर्क साधला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला. पालघरमधील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गणेश नाईक बोलत होते. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही. मात्र, लागलेल्याने ती योग्य टिकवली पाहिजे, असं सांगत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला.
प्रत्येकाचे नशीब आहे. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आनंदीची गोष्ट असल्याचे गणेश नाईक म्हणाले. पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमवलं आणि कसं कमवलं आणि किती टिकवलं हे महत्वाचं असल्याचे गणेश नाईक म्हणाले. यावर्षी 10 कोटी झालं लावण्याचे उद्दीष्ट असल्याचे गणेश नाईक म्हणाले.