एकजुटीने समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू, ‘गुढी’ उभारत अजितदादांच्या शुभेच्छा…
आज गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन गुढीची सपत्नीक पूजा केली आहे. यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकमान्य अन् शिवसेनाप्रमुख देशभर कसे पोहोचले? राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
“वसंतऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, आलेलं नववर्ष, सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. जीवनातल्या आशा-आकांक्षा, मनातली स्वप्ने पूर्ण होवोत. नवनिर्मितीच्या प्रयत्नांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो.
जीवनातली यशाची गुढी आभाळात उंच जावो,” या शब्दांत पवार यांनी मराठीप्रेमी बांधवांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी संस्कृतीत गुढीपाडव्याचं महत्वं अनन्यसाधारण आहे. घरोघरी गुढी उभारुन, गावात, शहरात शोभायात्रा काढून गुढीपाडवा साजरा केला जातो, नववर्षाचं स्वागत केलं जातं.
पारनेर कारखाना जमीन गैरव्यवहार प्रकरणावर विखे करणार फैसला
मावळत्या वर्षातील आनंददायी आठवणी सोबत घेऊन नववर्षाचं स्वागत करुया. एकजूट होऊन सुखी, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवूया, असं आवाहनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुभेच्छा राज्यातील जनतेला केलं आहे.
दरम्यान, राज्याचा गाडा हाकत असताना अजित पवार आपल्या निवासस्थानी सणउत्सव मोठ्या उत्साहात साजरे करत असतात, यासोबतच राज्यातील जनतेला शुभेच्छाही देत असतात. यंदाही त्यांनी गुढी उभारुन महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.