लोकमान्य अन् शिवसेनाप्रमुख देशभर कसे पोहोचले? राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

लोकमान्य अन् शिवसेनाप्रमुख देशभर कसे पोहोचले? राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. त्याचवेळी राज ठाकरेंनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)पूर्ण देशभर कसे आणि केव्हा पोहोचले याबद्दल सांगितले आहे. ते लोकमान्य सेवा संघ(Lokmanya Seva Union) पार्लेच्या शतकपूर्तीनिमित्त घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ते म्हणाले की, लोकमान्यांच्या चरित्राबद्दल अनेकांनी वाचलेलं असेल. पण मध्ये काही पुस्तकं वाचताना मला एक चांगला प्रसंग आढळला. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की, लोकमान्य संपूर्ण देशभर पोहोचले कसे? प्रत्येक राज्यात लोकमान्यांबद्दल कुतूहल आणि आकर्षण हे निर्माण झालं कसं? हा प्रश्न मला पडला आणि त्याचं उत्तर मला मिळालंही. त्याच्यातही योगायोग आहे.

Raj Thackeray तर महाराष्ट्राची अवस्था बिहार सारखी होण्याची भीती!

जसं मध्यंतरी कोरोनाचं संकट आलं होतं. त्याच्याआधी 100 वर्ष आलं होतं. 2020 ला आलं होतं म्हणजे त्याच्याआधीही 1920 ला ज्यावेळी लोकमान्यांचं निधन झालं होतं. काही लोक सांगतात की, त्याच्या 100 वर्षाआधीही असं संकट आलं होतं.

आता हे शंभर शंभर वर्षाचं काय असतं ते मला माहीत नाही, पण या वर्षामध्ये मला दिसलेली गोष्ट अशी की, 1892, 1893 मध्ये भारत देशामध्ये सर्वात मोठी हिंदू मुस्लिम दंगल घडली होती. त्यावेळी हिंदूंचं नेतृत्व बाळ गंगाधर टिळकांनी केलं होतं.

ते संपूर्ण देशभरात पोहोचण्याचं कारण त्या दंगलीतलं होतं, असंही सांगितलं. आणि मग बाकीच्या गोष्टी होत्या, त्याच्यात मला योगायोग असा वाटतो की, 1892 आणि 93 ला बाळ गंगाधर टिळक आणि 1992-93 ला बाळ केशव ठाकरे. त्यावेळी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. अशी बरोबर 100 वर्षानंतर ती गोष्ट घडली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे संपूर्ण देशभरात पोहोचले, असंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं. मला ती गोष्ट महत्वाची वाटते असंही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube