गांधींजींचा विचार शिल्लक नाही, गोडसेची भूमिका प्रत्येकाच्या काळजात; सदावर्ते बरळले, पवारांवरही टीका

  • Written By: Published:
गांधींजींचा विचार शिल्लक नाही, गोडसेची भूमिका प्रत्येकाच्या काळजात; सदावर्ते बरळले, पवारांवरही टीका

यवतमाळ : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर (Mahatma Gandhi) टीका करत नथुराम गोडसेची (Nathuram Godse) स्तुतीसुमनं उधळतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गांधींजींवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी सदावर्ते चांगलेच अडचणीत आले होते. गोडसेसोबत न्याय झाला नाही, असं ते म्हणाले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा सदावर्ते बरळले आहेत. आताही त्यांनी महात्मा गांधीजींवर टीका करत गोडसेचं कौतुक केलं. गांधीजींचा विचार आता शिल्लक नाही, असं ते म्हणाले.

आज यवतमाळ येथे एसटी कामगारांच्या आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सदावर्ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधींवर टीका करतांना आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचं गुणगात करतांना सदावर्ते म्हणाले की, ज्या प्रकारे शरद पवारांच्या विचारांना झोडपून काढलं, तसंच त्यांच्या बगलबच्च्यांना झोडपून हाकलून लावले आहे. अखंड भारताचे भाग्यविधाते नथुराम गोडसे यांची भूमिका प्रत्येक भारतीय काळजात ठेवून आहे. गांधींजींचा विचार आता काही शिल्लक राहिला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहे. पाकिस्तानधार्जिना विचार शिल्लक नाही. म्हणून असे विचार कॉंग्रेस कधीही संपवू शकणार नाही. शरद पवारांचा विचारसुध्दा नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतकाही नाही.

“कॉलर उडवतात, मुलींसोबत डान्स करतात, ही शिस्त आहे का?” केंद्रीय मंत्र्यांना सवाल; उदयनराजेंचा पत्रकाराला रागीट लुक 

शरद पवारांच्या बलगबच्चांनी सर्वसाधारण सभेत गदारोळ सोडा, एक शब्दही बोलता आला नाही. कष्टकरी जय श्री राम, वंदे मातरमच्या घोषणा देत होते. स्वत:ला कामगार म्हणून घेणाऱ्या संघटनेची घाणेरडी कृती आहे. ज्या अहवालावर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो आहे, ज्या अहवालावर हिंदु राष्ट्र भारत लिहिले आहे, या अहवालाला हात लावण्याचा प्रयत्न केला. म्हणून संघटनेच्या संदीप शिंदे याला झोडपून बाहेर काढला, असं सदावर्तेंनी सांगितलं.

यावेळी बोलतांना सदावर्तेंनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी होत होती, आता मात्र, वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. वेगळ्या विदर्भाच्या आड याल तर या भूमीत तुम्हाला पाय ठेऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube