ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईडचा स्फोट; 4 जण जखमी

अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईड फुटल्याची घटना घडली आहे. यात चार कर्मचारी जखमी झाले आहेत. 

  • Written By: Published:
ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईड फुटलं; 4 जण जखमी

Hand Grenade Explodes In Ahilyanagar Police Headquarters : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईड फुटल्याची घटना घडली आहे. यात चार कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्रॅनाईट बाबत माहिती देत असताना हातातच ग्रॅनाईटचा स्फोट झाला. त्यात चार कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्रॅनाईटबाबत माहिती देत असताना हातातच ग्रॅनाईटचा स्फोट झाला. त्यात चार कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. या घटनेत शुभम पांडुरंग कावरे वय 28, शिवराज संजय पवार, योगेश सोळुंके, गणेश मढे हे जखमी झाले आहेत.

मॉकड्रिलचं प्रशिक्षण सुरू होत तेव्हाच…

आमचा मॉक ड्रिलचा डेमो सुरू होता. आमच्या हातात ग्रेनाईड होते. ते कसे फोडायचे? काय करायचे? हे काहीच आम्हाला सांगितलं नव्हतं. ऑर्डर आल्यावर पिन ओढली आणि जागेवर हातात ब्लास्ट झाला. माझी करंगळी तुटली. डोळ्यात धूर गेला, असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं. दुसऱ्या एका जखमी कर्मचाऱ्यानेही याची माहिती दिली. आमच्याकडे ग्रेनाईड होते. आम्हाला त्याची माहिती आम्हाला नव्हती. सूचना होत्या. पण संपूर्ण सूचना दिल्या नव्हत्या. या स्फोटात माझी करंगळी तुटून पडली आहे, असं या जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं.

 

 

follow us