राजस्थानमध्ये आता गुरू-शिष्यांची जोडी! बागडे राज्यपाल तर रहाटकर भाजपच्या प्रभारी..
Haribhau Bagde : राष्ट्रपतींनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज (दि. 28 जुलै) महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. तर महाराष्ट्रातील भाजप नेत्या विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) ह्या राजस्थानमध्ये प्रभारी म्हणून काम करत आहेत. नवे राज्यपाल बागडे हे रहाटकर यांचे राजकीय गुरू आहेत. त्यामुळं आता बागडे आणि रहाटकर हे गुरु-शिष्य राजस्थानमध्ये एकत्र काम करणार आहेत.
शरद पवारांनीच मराठा समाजाची माती केली, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
हरिभाऊ बागडे हे विजया रहाटकर यांचे राजकीय गुरू आहेत. बागडे यांच्यामुळेच रहाटकर यांची राजकीय कारकीर्द चमकदार राहिली. बागडे यांच्यामुळेच रहाटकर यांना संभाजीनगरच्या महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांनाच रहाटकर यांना भापजच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून संधी मिळाली. इतकचं नाही तर राज्य महिला आयोगाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होता. त्यानंतर 9 सप्टेंबर 2022 साली रहाटकर यांची राजस्थानच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
फडणवीस-जरांगेंमधील भांडण नकली, ओबीसींना फसवण्यासाठी ते ठरवून भांडताहेत; आंबेडकरांचा दावा
रहाटकर प्रभारी असतांना विधासनभेत भाजपला यश
रहाटकर प्रभारी असतांना राजस्थान विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि भाजपने विधासनभा निवडणुकीत कॉंग्रेसला धुळ चारत अभूतपूर्व विजय मिळला . राजस्थानमध्ये भाजपच्या विजयात रहाटकर यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळं भाजपमध्ये रहाटकर यांचं वजन वाढलं.
दरम्यान, सध्या रहाटकर ह्या राजस्थान भाजपच्या प्रभारी असून आता बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राजस्थान सरकारवर सध्या महाराष्ट्रातील नेत्यांचं कंट्रोल असणार आहे.
कोण आहेत बागडे ?
हरिभाऊ बागडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. मराठवाड्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बागडे यांचा समावेश होतो. 1985 मध्ये तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. राज्यात 1995 मध्ये युतीचे सरकार असतांना त्या सरकारमध्ये हरिभाऊ बागडे हे रोहयो मंत्री होते. 2014 मध्ये त्यांना विधानसभेचे अध्यक्षही बनवण्यात आले होते.