धक्कादायक! शेगावमध्ये हॉटेल मालकाकडून महिला कर्मचाऱ्यांचे गुप्त चित्रीकरण अन् लैंगिक शोषण
Hotel owner sexually abused female बुलढाणा जिल्ह्यात हॉटेलच्या मालकाने महिला कर्मचाऱ्यांचे आंघोळ व्हिडिओ करून गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला.
Hotel owner secretly filmed and sexually abused female employees in Shegaon : बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या शेगाव शहरातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका हॉटेलच्या मालकाने आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांचे गुप्तपणे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीत करून त्यांचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. केतन देशपांडेंना ‘डॉ. बी.एम.एल. मुंजाल सोशल इम्पॅक्ट पुरस्कार’ प्रदान
मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव-खामगाव मार्गावरील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये अनेक महिला कर्मचारी काम करतात. या हॉटेलचा मालक ज्ञानेश्वर लिप्ते याने आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचे खासगी क्षण चोरून मोबाईलमध्ये कैद केले. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित महिलेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आरोपीने केवळ धमकी देऊन थांबले नाही, तर त्या भीतीचा फायदा घेत संबंधित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सततच्या छळाला कंटाळून पीडित महिलेने अखेर धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पीडितेच्या तक्रारीत आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर महिलांनाही अशाच प्रकारे त्रास दिल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शेगाव पोलीसांनी तातडीने कारवाई केली आहे. आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविणे अनिवार्य
संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आर्थिक गरजेमुळे काम करणाऱ्या महिलांचा गैरफायदा घेणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पोलिस आरोपीच्या मोबाईलची तपासणी करत असून आणखी काही महिलांचे व्हिडिओ किंवा पुरावे समोर येतात का, याचाही शोध घेतला जात आहे.