लेट्सअप विशेष: मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थान नक्की आहे तरी कसे?

लेट्सअप विशेष: मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थान नक्की आहे तरी कसे?

मुंबई : गेल्या काही दिवसांत विशेषतः उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शासकीय बंगला म्हणजे वर्षा निवासस्थान कायम चर्चेत राहिले आहे. राजकारणात असणाऱ्यांना वर्षा निवासस्थानाच कायम आकर्षण राहिले आहे. 

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून नावारुपाला आलेला वर्षा बंगला हा पूर्वी मंत्र्यांचा बंगला होता. तो मुख्यमंत्री निवासस्थान कसा झाला? नक्की हे वर्षा निवासस्थान आहे तरी कसे? त्याचा इतिहास काय? हे पाहणं रंजक आहे. 

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणून परिचित असलेल्या वर्षा बंगल्याच पूर्वीच नाव होतं ‘डग बिगान’. अडगळीत असलेला साधा बंगला…. बैठी इमारत, मोकळ आवार, शेजारी एक कोटी इमारत वाजा कार्यालय, बंगल्याच्या मागे लॉन. इतका साधा हा बंगला होता.

मुंबईत जुना महापौर बंगला, रामटेक, रॉयल स्टोन, देवगिरी, पुरातन (आता पडला), शिवनेरी यासारख्या आलिशान मंत्री बंगल्याच्या समोर अगदी साधी बांधणी असलेला हा बंगला होता. पण मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान म्हणून जी मान्याता मिळाली ती सर्वश्रेष्ठ बनली. प्रत्येकाला हवाहवासा वाटायला लागला. 

पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सह्याद्री हा मुख्यमंत्र्यांच शासकीय निवासस्थान होतं. अतिशय आलिशान, जिथून निळाशर समुद्र दिसायचा, मनमोहक क्विन नेकलेस दृष्टीस पडताच, दाट झाडी अतिशय भुरळ पाडेल अशी वास्तू होती. जी आता शासकीय सह्याद्री अतिस्थी गृह झालं आहे.

वसंतराव नाईक कृषिमंत्री होते. तो काळ म्हणजे १९५६चा, बंगल्यांच वाटप झालं त्यावेळी हा “डग बिगान” हा बंगला मिळाला, अतिशय साधा बंगला असल्याने कुणी घेतला नाही.

अडगळीत पडलेला बंगला मिळाला अशीच वसंतराव नाईक यांच्या पत्नी वत्सलाबाई यांची धारणा झाली होती. पण वसंतराव यांनी या बंगल्याचा कायापालट केला. झाडी लावली, शेती आणि पावसाची आवड असलेल्या वसंतरावांनी या बांगल्याच रूप पालटल.

७ नोव्हेंबर १९५६ ला ते या बंगल्यात राहायला आले. पावसाळ्याच्या दिवसात अतिशय सुंदर दिसणाऱ्या या वातावरणात वसंतराव यांनी या बंग्ल्याच ‘वर्षा’ असं नामांतर केलं. अगदी एक वर्ष होत नाही तोच तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवार यांचं निधन झालं. त्यावेळी वसंतदादांना सह्याद्री बंगल्यात जायचं होत, पण वसंत दादा आणि त्यांच्या पत्नी वत्सलाताई यांनी याचं बंगल्यात राहणं पसंत केलं.

तेंव्हापासून वर्षा बंगला शासकीय निवासस्थान झाला. नंतर बाबासाहेब भोसले, सुधाकर नाईक, एआर अंतुले, शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे या सर्वांच्या काळात वर्षा हा बंगलाच मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थान म्हणून कायम राहिला. 

पुलोद सरकारच्या काळात शरद पवार वर्षा निवासस्थान येथे न राहता, त्यांच्या मंत्री बंगल्यात राहिले. पण नंतर मुख्यमंत्री झाल्यावर ते वर्षा बंगल्यात आले. 

प्रत्येक मुख्यमंत्री वेगळा, त्याची राहणी, आणि वागणुकीची पद्धतही वेगळी होती. वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले. या बंगल्याने लोकांची आणि अधिकाऱ्यांची वर्दळ कायम अनुभवली. सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते त्या काळात सात वाजल्यानंतर बंगल्यात कुठलही कामकाज होत नसे. शासकीय कामकाज तर अगदी नसल्यासारखे होते.

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यावर वर्षा निवासस्थानचे दरवाजे सदैव सर्व सामान्य लोकांसाठी खुले राहिले. त्याच्या चर्चाही खूप झाल्या. सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात गणपती मूर्ती बसवण्याची परंपरा सुरू झाली. नंतर मनोहर जोशी, नारायण राणे यांच्या काळात गणपती उत्सवामध्ये अनेकांना आमंत्रित करण्याची प्रथा सुरू झाली ती आजपर्यंत कायम आहे. 

पूजापाठ, धार्मिक विधी या आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे कायम होत आल्या. पण त्या काळात त्या बातमी म्हणून कधीही झाल्या नाहीत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सत्यसाई जेव्हा वर्षा बंगल्यावर आले तेंव्हा महारष्ट्रमध्ये मोठी चर्चा झाली. टीका झाली पण अशोक चव्हाण यांनी याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बंगला सोडताना धार्मिक विधी केल्याच्या बातम्या समोर आणल्या गेल्या. पण केवळ ऐकीव आणि चर्चेचा विषय झाला. आता यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील धार्मिक विधीचे आरोप झाले.

त्याला प्रतिउत्तर म्हणून मी वर्षा निवसस्थानमध्ये आलो त्यावेळी लिंबू सापडले. अशा शब्दात त्यांनी उध्दव ठाकरे यांना टोला लगावला. वर्षा निवासस्थान पुन्हा चर्चेत आले. 

प्रफुल्ल साळुंखे
विशेष प्रतिनिधी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube