Nashik Graduate Constituency : मी विजयाच्या अगदी जवळ पण.., सत्यजित तांबे म्हणाले
अहमदनगर : माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून निघून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव करणार नसून सहाकार्यांनी संयम राखण्याचं आवाहन नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केलं आहे.
विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.
सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.
मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 2, 2023
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना तिसऱ्या फेरीत 45 हजार 660 मते मिळाली असून शुभांगी पाटील यांना 24 हजार 927 मते मिळाली आहेत. त्यामुळे विजयाच्या आपण अगदी जवळ असून विजयोत्सव साजरा करणार नसल्याचं ट्विट तांबे यांनी केलं आहे.
तांबे ट्विटमध्ये म्हणाले, “विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा, असं आवाहन सत्यजित तांबे यांनी केलंय.
तसेच मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, अशी विनंतीही त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. सत्यजित तांबे यांचा सहकारी, विश्वासू मित्र मानस पगार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
मानस पगार यांच्या मृत्यूनंतर सत्यजित तांबे यांनी ट्विटरद्वारे पोस्ट शेअर करत मानस पगार यांना श्रध्दांजलीही वाहिली आहे. सत्यजित तांबे यांचा जवळचा मित्र निघून गेल्याने विजयी झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करणार नसल्याचं दिसून येत आहे. मानस पगार यांच्यावर नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यपदाची जबाबदारी होती. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जात होते.