Maharashta Politics : मी भविष्यात अपक्षच राहणार, तांबेनी सांगितले पटोलेंच षडयंत्र…

  • Written By: Published:
Maharashta Politics : मी भविष्यात अपक्षच राहणार, तांबेनी सांगितले पटोलेंच षडयंत्र…

अहमदनगर : नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीच्या मतदार संघाचे AB फॉर्म देण्यात आले असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. AB फॉर्म सारखे महत्वाचे फॉर्म प्रदेशाध्यक्षाने चुकीचे दिले चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता. असा आरोपही सत्यजीत तांब यांनी पाटोलेंवरती केला. चुकीचे फॉर्म देणाऱ्यांवर काँग्रेस काय कारवाई करणार का ?असा सवाल देखील तांबेनी केला.

मी अपक्ष नाही तर काँग्रेसच्या नावाने फॉर्म भरला पण AB फॉर्म नसल्यामुळे तो अपक्ष बनला तसेच हे मला आणि बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी करण्यात आलं, हे सगळं ठरून करण्यात आलं असा देखील आरोप त्यांनी केला. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं काम काही नेत्यांकडून केलं जात आहे असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी पटोलेंच नाव न घेता केला.

तांबे पुढे म्हणाले की, युवक काँग्रेसचं पद गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला कुठेतरी संधी देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. त्याला विधान परिषदेवर घेतात. यासाठी ज्यावेळी मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे जायचो, तेव्हा तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत.त्यामुळे तुम्हाला विधान परिषद देता येणार नाही, असं सांगितलं जायचं. वास्तविक माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने नाशिक मतदारसंघ वाढवला आहे. २००९ पासून माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने हा मतदारसंघ उभा केला आहे.

“पण जेव्हा मी आमचे पक्षश्रेष्ठी एच के पाटील यांना भेटून मला संधी द्या, असं सांगितलं. मला संघटनेत एखादं पद किंवा जबाबदारी मागितली होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर विधान परिषदेची निवडून लढा असं सांगण्यात आलं, असं जेव्हा एच के पाटील बोलले तेव्हा मला प्रचंड संताप आला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांच्या जागेवर जर मला निवडणूक लढवायची असती, तर मी २२ वर्षे संघटनेसाठी जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं. मला पक्षाने किंवा संघटनेनं काहीतरी द्यावं, अशी मानसिकता आहे, वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही, हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, पण दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले, याला माझा पूर्णपणे विरोध होता,” अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबेंनी मांडली आहे.

तसेच तांबे पुढे म्हणाले, मामा आणि वडिलांसोबत निवडणूक लढवण्याबाबत चर्चा केली, माझी मानसिकता नसल्याने मला निवडणूक लढवण्याचे सांगितले. परंतु ऐनवेळी माझ्या वडिलांची उमेदवारी का फायनल केली असा देखील सवाल त्यांनी केला.

दिल्ली नेतृत्व माझ्याशी बोलत असताना राज्यात वेगळंच चालू होत. या सर्वांची माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. परंतु माझ्या पक्षाची बदनामी होईल म्हणून मी ती बाहेर नाही काढणार. शेवटी ते म्हणाले मी कोणत्याही पक्षात न जाता अपक्षच राहील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube