Abu Azmi On BMC : सिद्ध करून दाखवा, आजच आमदारकीचा राजीनामा देतो…

Abu Azmi On BMC :  मुंबई महापालिकेने मुंबईतील झोपड्यांवर अतिक्रमण आणि तोडफोड कारवाई करण्याचा निर्णण घेतला आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Abu Azmi On BMC

Abu Azmi On BMC :  मुंबई महापालिकेने मुंबईतील झोपड्यांवर अतिक्रमण आणि तोडफोड कारवाई करण्याचा निर्णण घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी आक्रमक भूमिका घेत या निर्णयाचा विरोध केला आहे. मुंबईतील 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांवर 1 ऑक्टोबरपासून होणारी तोडफोड कारवाई सरकारनं तात्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला.

यावेळी अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले की, मुंबईत लाखो झोपड्या आहेत.  मला आठवते की, जेव्हा मनोहर जोशींचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की 8 जानेवारी 1995 पर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व झोपड्यांना ते घरे उपलब्ध करून देतील. मात्र, त्यानंतर नवीन झोपड्या बांधल्या जाऊ नयेत यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. तसेच जर नव्या झोपड्या निर्माण झाल्यातर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा देखील त्यांनी इशारा दिला होता. मात्र त्यानंतर 2000 पर्यंत आणि त्यानंतर 2011 पर्यंत असलेल्या झोपड्यांना मान्यता देण्यात आली होती.  या देशात गरीब लोक आहेत आणि वास्तव हे आहे की, आज अनेकांना दोन वेळचे जेवणही परवडत नाही. सरकार 85 कोटी लोकांना 5 किलो रेशन पुरवते, ज्यामुळे त्यांना आपला उदरनिर्वाह करणे शक्य होते. आपल्या देशात काही लोकांकडे इतका पैसा आहे की, त्यांना स्वतःच्या संपत्तीचा नेमका आकडाही माहित नाही. तर दुसरीकडे असेही लोक आहेत ज्यांच्याकडे साध्या जेवणाचीही सोय नाही असे लोक याच भागात राहतात आणि आता सरकार म्हणते की ही घरे पाडणार आहेत असं अबू आझमी म्हणाले.

तुम्ही भूमिका बदलणार अन् एनडीएत जाणार? शरद पवार म्हणाले…

पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले की, जोपर्यंत महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांचे खिसे भरले जात नाहीत. जेव्हापर्यंत अधिकाऱ्यांना पैसे मिळत नाही तेव्हापर्यंत घराचा काम एक इंच देखील पुढे जात नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच ज्या लोकांनी सरकारला मत दिलं त्याच लोकांची आज घरे पाडली जात आहे असेही यावेळी अबू आझमी म्हणाले. तर दुसरीकडे मोठा दावा करत अबू आझमी म्हणाले की, मी कोणत्याही झोपडपट्टीच्या वाढीस कधीही मदत केलेली नाही. जर एकाही अधिकाऱ्याने हे सिद्ध केले की, मी झोपडपट्टीच्या बांधकामाला प्रोत्साहन दिले किंवा मदत केली, तर मी त्याच दिवशी राजकारणातून निवृत्ती घेईन.

follow us