वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असतानाच दुसरी घटना; नाशिकमध्ये विवाहितेची कौटुंबीक जाचामुळे आत्महत्या

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असतानाच दुसरी घटना; नाशिकमध्ये विवाहितेची कौटुंबीक जाचामुळे आत्महत्या

Woman Commits Suicide In Nashik : पुणे मुळशी येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असतानात आत दुसरी बातमी आली आहे. नाशिक येथील भक्ती अपूर्व गुजराथी ( ३७ ) या विवाहितेने सासरच्या जाच आणि मानसिक त्रासाला कंटाळून (Suicide) गळफास घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर तिच्या माहेरच्या मंडळींना तिच्या मृतदेहाला ताब्यात घेण्यास नकार देत मोर्चा काढला होता. या प्रकरणात पसार झालेल्या पती, सासरे आणि सासू यांना अटक करण्यात आली आहे.

भक्ती अपूर्व गुजराथी (३७) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवल्याने नाशिक येथे खळबळ उडाली होती. भक्तीच्या पालकांनी आपल्या मुलीचा सासरी छळ होत असल्याची तक्रार केली होती. भक्ती हीचे पती, नणंद आणि सासु आणि सासरे यांच्यावर भक्तीवला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर भक्ती हीचे पती आणि सासरीची मंडळी फरार झाली होती.

वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेल्या चांदीच्या भांड्यासह हगवणेंकडून एक कार अन् दोन पिस्तूल जप्त

अखेर या प्रकरणात नाशिक पोलिसांनी तिघा आरोपींना गुजरात येथून अटक केली. भक्ती गुजराती तिचे पती अथर्व गुजराती, सासरे योगेश गुजराती,सासू मधुरा गुजराथी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गंगापूर पोलीस यासंदर्भात पुढील तपास करीत आहे. या तिघांना नाशिकच्या क्राईम ब्रँचने अटक करुन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले होतं असं सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक पद्मजा बढे यांनी सांगितलं.

माझ्या मुलीला खूप टॉर्चर करायचे, दुसऱ्या जातीची असल्याचं म्हणायचे. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती हे खरं असलं तरी तिने स्वत:ला संपवलं असं वाटत नाही. त्यांनीच काहीतरी केलं आहे असा आरोप तीच्या वडिलांनी केला आहे. ८ वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना पाच वर्षांचा मुलगा झाला आहे. आधी सासू सासरे हीन वागणूक देतच होते. नंतर नवऱ्याकडूनही त्रास सुरू झाला. भावाजवळ मागणी केली होती. घरातील स्थिती पाहता आत्महत्या नसल्याचा संशय वाटतो असं भक्तीच्या वडीलांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या