महात्मा फुलेंनी इंग्लंडच्या राजाकडे ‘या’ मागण्या केल्या होत्या; पवारांनी सांगितली फुले-पंचम जॉर्ज भेटीची घटना

महात्मा फुलेंनी इंग्लंडच्या राजाकडे ‘या’ मागण्या केल्या होत्या; पवारांनी सांगितली फुले-पंचम जॉर्ज भेटीची घटना

Instead of breaking gravel, Mahatma Phule demanded a water conservation project : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुलेंच्या (Mahatma fule) कृषिविषय दृरदृष्टीचा दाखल देत एक ऐतिहासिक घटना सांगितली. इंग्लंडचे राजा पंचम जॉर्ज आणि महात्मा फुलेंच्या ऐतिहासिक भेटीची आठवण पवारांनी सांगितली. अमरावतीमध्ये अॅग्रीकल्चर फोरमच्या (Agriculture Forum) अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, इंग्लंडचा राजा हा भारतात येणार होता. त्यावेळी गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला अनेक गोरे अधिकारी थांबले होते. तिथंच कोपऱ्यात डोक्याला फेटा बांधलेला, साधा धोतर अन् कुर्ता घातलेला शेतकऱ्यांसारखा दिसणारा एक व्यक्ती थांबला होता. त्याच्या हातात एक कागद होता. राजा उतरला, पोलिसांनी सर्वांना बाजूला केलं. त्या फेटेवाल्याला देखील बाजुला केलं. पण, राजा पंचम जॉर्जची नजर त्या फेटेवाल्या व्यक्तीवर पडली. राजाने आपल्या अंगरक्षकांना विचारलं की, त्या व्यक्तीच्या हातात कागद दिसतो आहे. त्यांना काही निवदेन द्यायचं आहे का? असं विचारत त्या फेटेवाल्याला बोलावून घेतलं. त्यानंतर त्या व्यक्तीनं राजाला निवदेन दिलं. तो निवेदन देणारा दुसरा तिसरा कुणी नसून महात्मा फुले होते.

फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक

राजाने ते निवदेन वाचलं तर त्यात काय मागण्या होत्या. तर या निवेदनात लिहिलं होतं की, पिढ्यानपिढ्या आमच्या राज्यात दुष्काळ पडतो. त्या काळात रोजगार म्हणून खडी फोडण्याचं काम दिलं जातं. आता खडी फोडण्याची शिक्षा बंद करा, त्याऐवजी इथं पडणारा पावसाचा थेंब अन् थेंब साठवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याचा प्रकल्प हाती घ्या. त्यासाठी आम्ही कष्ट करायला तयार आहेत.

दुसरी मागणी होती, आम्ही पिढ्यान पिढ्या ज्वारीचं पिक घेतो. त्यातीलच काही ज्वारी पुढच्या हंगामात पिक म्हणून वापरतो. त्यामुळं बियाची प्रतवारी कमी होते. म्हणून आज याचा वाण सुधारला पाहिजे. त्यासाठी विलायतेतून दुसरा वाण आणून संकर नवीन संकरीत जात तयार केली पाहिजे. त्यांच्या या मागणीत वैज्ञानिक दृष्टीकोन होता,

तिसरी मागणी होती की, आमच्याकडे शेतकऱ्याला जोडधंद्याची गरज आहे. तो जोडधंदा फक्त दुधाचा आहे. पण, आमच्याकडे गायीचं दुध कमी होतं. त्याचं कारण, समरक्ताचा संगम गायींमध्ये होतो. त्यामुळं पुढील पिढीत समरक्त आहे. त्यामुळं पाहिजे तशी प्रतवारी तयार होत नाही. ही प्रतवारी आणि दुधाचं उत्पादन वाढवायचं असेल तर विलायतेून वळू पाठवा आणि संकर करन नवीन वाण तयार करा, ह्या मागण्या महात्मा फुलेंनी राजा पंचम जॉर्ज यांच्याकडे केल्या. यातून महात्मा फुलेंची दुरदृष्टी दिसून येते.

ते म्हणाले की, आज विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषयी आपल्या राजकीय पटलावर अधूनमधून चर्चेत होते. त्यातून मग राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याच्या घोषणा केल्या जातात. पण शेती आणि शेतीकऱ्यांशी संबंधित समस्यांच्या मुळावर उपचार न करता केवळ तात्कालिक उपाय शोधून आश्वासन पूर्तीची औपचारीकता पार पाडली जाते. आपली अर्थव्यवस्था कृषी आधारित असतांनाही शेतीतून भांडवल निर्मितीला चालना देण्यापेक्षा उद्योगांना पूरक अर्थनिती अवलंबल्याने ही स्थिती उद्भवली. त्यामुळं सरकारला खरोखरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर आधी कृषिकेंद्रीत अर्थनीती अमलात आणावी लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube