अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणार, थेट भारतावर परिणाम

Iran to shut the Strait of Hormuz: होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यासाठी उपाययोजना करण्यास इराणच्या संसदेने मंजुरी दिलीय.

  • Written By: Published:
Iran to shut the Strait of Hormuz

Iran to shut the Strait of Hormuz: इराण-इस्रायल (Iran Israel War) संघर्ष हा टिपेला पोहोचला आहे. यात आता अमेरिकेने उडी घेतलीय. अमेरिकेने घातक बॉम्ब टाकून इराणचे अणुऊर्जा तळ उद्धवस्त केले आहेत. त्यामुळे इराणने इस्रायलवर प्रतीहल्ले केले आहेत. अमेरिकेने केल्या हल्ल्यानंतर इराणाने (Iran) एक मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक तेल व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद (Strait of Hormuz) करण्यासाठी उपाययोजना करण्यास इराणच्या संसदेने मंजुरी दिलीय. याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेणार आहे.

ठाकरे गटात लेटर बॉम्बचा धमाका! बड्या नेत्याने ठाकरेंची साथ सोडली; पत्रात खळबळजनक दावे

पर्शियन आखाताच्या तोंडावर एक अरुंद मार्ग असलेला होर्मुझचा सामुद्रधुनीतून मोठे जहाजे जातात. हा मोठा व्यापारी मार्ग आहे. जगातील दैनंदिन तेल उत्पादनाच्या सुमारे वीस टक्के भागााची निर्यात याच मार्गाने होते. सौदी अरेबिया, इराक आणि युएईसह प्रमुख तेल उत्पादक देशांकडून या मार्गाने निर्यात केली जाते. हा मार्ग बंद होणे भारतासाठी सर्वाधिक नुकसानकारक ठरणार आहे. कारण चाळीस टक्के कच्चे तेल (crude oil) भारताला या मार्गाने येते. तर 50 टक्के एलएनजी गॅसही येथूनच येतो. त्यामुळे भारताला सर्वाधिक मोठा फटका याचा बसू शकतो.

Iran and Israel War : इराणला अण्वस्त्र पुरवण्यास अनेक देश तयार, रशियाच्या माजी अध्यक्षांचा दावा

संसदीय राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य मेजर जनरल कौसारी यांनी सांगितले की, हा उपाय अमेरिकेच्या हल्ल्याला निर्णायक आणि कायदेशीररित्या उत्तर देण्यासाठी घेण्यात आलाय. त्यामुळे जगाला याचा आर्थिक परिणाम भोगावा लागणार आहे.


ब्रेंट क्रूड 90 डॉलरपर्यंत जाणार

या निर्णयाबाबत सिटीग्रुप बाजार विश्लेषकांनी मत व्यक्त केलाय. याचा परिणाम जागतील बाजारपेठेवर होणार आहे. हा मार्ग बंद झाल्यास तेलाच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होईल. त्यामुळे जागतिकस्तरावर कच्चा तेलाच्या किंमती 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जावू शकतात. सध्या कच्चे तेल 75 डॉलरवर जाऊ शकते. हा मार्ग जेवढ्या दिवस बंद राहील तोपर्यंत कच्चा तेलाच्या किंमती वाढत राहील. प्रमुख तेल आयात देशाने आधील फॉलबॅक योजना आखली आहे.

follow us