भंगार पुस्तकाच्या…; बोरवणकर अजितदादांच्या प्रकरणात मिटकरींची एन्ट्री
अकोला : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जमिनीबाबत केलेल्या गंभीर आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर अजितदादांवर आरोप करत असल्याचे मिटकरी (Amol MItkari) यांनी म्हटले आहे. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून पोलील दलाच्या जमीन विक्रीचे गंभीर आरोप अजितदादांवर केले असून, सध्या पोलीस दलापासून सगळीकडे याच आरोपांची चर्चा सुरू आहे. (Amol Mitkari On Meera Borwankar allegation On Ajit Pawar )
अजितदादांनी नकाराचा ‘काही दिवसांतच’ बदला घेतला; मीरा बोरवणकरांचा आणखी एक स्फोटक दावा
…तर कायदेशीर कारवाईला सामोरे जा
दुसरीकडे बोरवरणकर यांच्या आरोपांचा समाचार घेत मिटकरींनी या आरोपांमागे बोलविता धनी कोण? असा प्रश्न उपस्थित करत आपलं भंगार पुस्तक विकलं जावं यासाठी बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. जर, हे आरोप खरे असतील तर, बोरवणकर यांनी पुरावे द्यावे अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे. हा आरोप आमच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे म्हणच घर का भेदी लंका ढाये असा हा प्रकार आहे.
बोरवणकरांचे नेमकं आरोप काय?
बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात कुठेही थेट अजित पवार यांचे नाव घेतले नसले तरी त्या 2010 च्या दरम्यान पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या आणि त्यांनी ‘पालकमंत्री दादा’ असा उल्लेख केला आहे. यादरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. त्यामुळे ते ‘दादा’ म्हणजे अजित पवारच असल्याचे सांगितले जात आहे.
पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत होते. त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत, तुम्ही त्यांना एकदा भेटा. याचवेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनजवळील जमिनीसंदर्भातील असल्याचंही त्यांनी सांगितलं.“मी विभागीय कार्यालयातच पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितलं की, या तीन एकर जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी”
‘मी महाजनांपेक्षा मोठा आमदार, पण त्यांनाच नेहमी मोठी खाती…’; गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले
“हे ऐकताच मी त्यांना माझी बाजू सांगितली. मी त्यांना म्हंटलं, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही. शिवाय कार्यालय आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज लागेल. यासोबतच मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. अशावेळी सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्यांनी माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. पण, मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकारला, असाही गौप्यस्फोट बोरवणकर यांनी केला आहे.
माझा संबंध नाही
बोरवणकर यांच्या आरोपांनंतर एकीकडे खळबळ उडालेली असताना, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी कधीही अशा जमिनीच्या लिलावात सहभागी झालो नाही. खरे तर अशा लिलावांना माझा विरोध आहे. इतकंच नाही तर जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना नाहीत. आम्ही अशा जमिनी विकू शकत नाही.
असे मुद्दे महसूल विभागासमोर जातात, जे राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवतात. मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. रेडी रेकनर दरानुसार जमिनीची किंमत ठरवतात. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हे मला सांगायचे आहे… अशा प्रकरणांमध्ये मी नेहमीच सरकारची बाजू कशी घेतो हे तुम्ही अधिकाऱ्यांकडून तपासून घेऊ शकता. माझ्यावर दबाव असला तरीही मला पर्वा नसते, असा खुलासा त्यांनी केला आहे. तर “या प्रकरणावर भाष्य करण्यापूर्वी मला रेकॉर्ड पहावे लागेल,” असे त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Sonia Agrawal Konjety : लेट्सअप नवदुर्गा निमित्त विशेष मुलाखत