श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाच्या प्रश्नासंदर्भात जैन संप्रादायाने घेतली शरद पवारांची भेट
पुणे : जैन धर्माचे पवित्र स्थळ श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाच्या प्रश्नासंदर्भात जैन समाजाच्या संप्रदायाने आज पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जैन समाजाच्या तीव्र भावना समजून घेतल्या आहेत.
नुकताच सम्मेदजी शिखरजी तीर्थक्षेत्राबाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे हे पवित्र तीर्थक्षेत्र आहेत.
या तीर्थक्षेत्र परिसरात बांधकाम, हॉटेल, ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, हे पवित्र स्थळ यापुढे पर्यटन क्षेत्र राहणार नाही. सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांवर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी दिलेला आदेश गुरुवारी मागे घेतला असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हंटले आहे. दरम्यान, पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र अधिसूचनेच्या कलम-3 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन समाजाकडून देशातील विविध देशांत आंदोलन करण्यात आलं होतं. तर गुजरातमध्ये पलिताणा येथील जैन मंदिरात तोडफोडीनेही जैन समाज आक्रमक झाला होता.
याच पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या चारही सांप्रदायाने शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली आहे.