Jayant Patil : पक्षाचं चिन्ह कायम राहील; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचा (NCP)राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress)आणि सीपीआय (CPI)या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. परंतू आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. येत्या काळात काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो.” असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Mahavikas Aghadi : महाराष्ट्र दिनी मुंबईतल्या बीकेसीवर ‘वज्रमूठ’ नागपूर पाठोपाठ राजधानीत सभा
“निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय देशातील इतर पक्षांबाबतही घेतला आहे. यात अनेक वर्ष जुना असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश आहे. या निर्णयावर मतमतांतरं आहेत, मात्र आता निर्णय झाला आहे.” याशिवाय त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कायम राहील. महाराष्ट्रापुरता या चिन्हाला कोणताही धक्का लागेल, असं वाटतं नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही.”
राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही आमचं म्हणणं…
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी नेमके निकष काय आहेत?
लोकसभा निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये दोन टक्के जागांवर विजय मिळवणे आवश्यक असते.लोकसभेत किमान चार जागा आणि किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजे. पक्षाला चार किंवा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
किमान चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे गरजेचे आहे. यातील एक निकष पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला तर त्या पक्षाला देशभरात एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येते. त्याचबरोबर राजधानी दिल्लीत पक्षकार्यालयासाठी जागा मिळत असते.