आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय, अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला 4-1ने हरवलं

India wins Asia Hockey Cup 2025 : भारताने दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने आशिया कप स्पर्धेचं जेतेपद चौथ्यांदा पटकावलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अजेय राहिला. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमवला नाही. सुपर 4 फेरीतील एकमेव सामना दक्षिण कोरियासोबत झाला होता.
हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. मात्र अंतिम फेरीत भारताने दक्षिण कोरियाला पुन्हा संधी दिली नाही. पहिल्या मिनिटापासून भारतीय संघाने आघाडी घेतली. सुखजीत सिंगने 30 व्या सेकंदाला पहिला गोल केला. (Hockey) त्यामुळे दक्षिण कोरिया संघाची बरोबरीची धडपड सुरु झाली. मात्र त्यांना पहिल्या सत्रात तर बरोबरी काही साधता आली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात भारत आघाडी घेत राहिला. तर चौथ्या सत्रात एक गोल करण्यात कोरियाला यश आलं. पण तिथपर्यंत बराच वेळ झाला होता.
टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; सरावादरम्यान खेळाडूला दुखापत, पहिल्या सामन्यापर्यंत फिट होणार?
दुसऱ्या सत्रात भारताने आणखी एका गोलची आघाडी घेतली. दिलप्रीत सिंगने 27 व्या मिनिटाला हा गोल साधण्यात यश आलं. यामुळे टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली. संजयने लाँग बॉल घेत तो दिलप्रीतकडे पास केला. दिलप्रीतने या संधीचं सोनं केलं आणि गोलकीपरच्या पायांमधून गोलपोस्टच्या आत चेंडू मारला. यासह भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. चौथ्या सत्रात अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवरून भारतासाठी हा गोल केला.
यासह 4-0 ची आघाडी घेतली. या सत्रात कोरियाने कमबॅक करण्याच पुरेपूर प्रयत्न केला आणि एक गोल मारला. तेव्हा स्थिती 4-1 अशी झाली. भारताने यापूर्वी पहिल्यादा 2003 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 4-2 पराभूत केलं आणि विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 मध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला. या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 7-2 ने धुव्वा उडवला होता. त्यानंतर 2017 मध्ये मलेशियाला 2-1 पराभूत केलं होते. आता 2025 स्पर्धेत दक्षिण कोरियाला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं.