टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; सरावादरम्यान खेळाडूला दुखापत, पहिल्या सामन्यापर्यंत फिट होणार?

Team India

Asia Cup 2025 Sanju Samson Fitness concern : आशिया कप सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहे. भारतीय संघ आशिया कपसाठीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दुबईला पोहोचला देखील आहे. तिथे भारतीय संघाचा सरावही सुरु झाला आहे. मात्र आशिया कप सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यूएईशी टीम इंडियाचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

मला सांगायला लाज वाटते पण बीडमध्ये सामाजिक समता आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल

ही टीम इंडियाची (Team India) चिंता वाढवणारी बातमी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनबद्दल (Sanju Samson) आहे. संजूला सरावादरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. सराव करताना झालेल्या दुखापतीमुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचेही सांगितले जाते आहे. संजूचे काही फोटो सोशल मीडियावर आले आहेत. या फोटोंमध्ये तो (Sanju Samson) खूप अस्वस्थ दिसत आहे. याशिवाय, सरावाचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. यामध्ये जितेश शर्मा विकेटकीपिंगचा जोरदार सराव करत आहे. जितेश शर्माचा सराव पाहून संजूच्या दुखापतीची शक्यता आणखी वाढली आहे. संजूला (Sanju Samson) कोणती दुखापत झाली आहे? तो टीम इंडियासाठी (Team India) आशिया कपमध्ये पहिला सामना खेळेल की नाही? याबद्दल मात्र कोणतेही अधिकृत विधान अद्याप समोर आलेले नाही.

मला सांगायला लाज वाटते पण बीडमध्ये सामाजिक समता आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल

संजूला दुखापत कशी झाली?

टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना सुरू होण्याच्या चार दिवस आधीच सॅमसन (Sanju Samson) सराव सत्रात दुखापतग्रस्त दिसत होता. यावेळी नेट्समध्ये सराव सुरू असताना त्याला चालण्यात अडचण येत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भारतीय संघ 4 सप्टेंबर रोजी दुबईला पोहोचला. 5 तारखेपासून भारतीय संघाने (Team India) सरावाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी मात्र त्याला काही त्रास असल्याचे दिसले नाही. मात्र 6 सप्टेंबरला आयसीसी अकॅडमीतील सराव सत्रात सॅमसनच्या (Sanju Samson) उजव्या पायात त्रास असल्याचे दिसून आले.

मोठी बातमी, PM मोदी 9 सप्टेंबर रोजी पंजाब दौऱ्यावर, पूरग्रस्त भागासाठी करणार घोषणा?

पहिल्या सामन्यापर्यंत फिट होणार?

गेल्या वर्षभरात संजू सॅमसन (Sanju Samson) उत्तम फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या केरळ क्रिकेट लीगमध्ये त्याने फक्त 5 डावांत 30 षटकार ठोकले होते. त्यामुळे आशिया कपसाठी तो संघाच्या (Team India) योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू (Sanju Samson) मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबरला UAE विरुद्ध आहे. त्यामुळे टीम इंडिया (Team India) हीच अपेक्षा आहे की, तोपर्यंत संजू पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात उतरेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube