गेल्या 35 दिवसांत सगळ्या मर्यादा पार झाल्यात; आव्हाडांनी थेट सुनावले
ठाण्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला माराहण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
काँग्रेस पक्षाचे ठाण्याचे प्रवक्ते गिरीश कोळी यांना ही मारहाण करण्यात आली आहे. शिवसेनेच्या कोपरी विभागाचे उपविभाग प्रमुख बंटी बाडकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मारहाण केली आहे. याघटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याघटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; पोलिसांच्या गाड्या जाळल्या
हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्या साठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड. मग पोलिस छळणार. स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार, जेल मध्ये सडवणार. हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे, आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार, असे म्हणत त्यांनी शिंदे सरकरावर निशाणा साधला आहे.
Satej Patil यांचं महाडिकांना आव्हान : कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा…
आव्हाड यांनी या घटनेची माहिती देणारी पोस्ट देखील लिहली आहे. मा. महाराष्ट्र राज्याचे ना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागितली, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.