छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; पोलिसांच्या गाड्या जाळल्या

  • Written By: Published:
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; पोलिसांच्या गाड्या जाळल्या

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी आणि पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली आहे. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आता परिस्थिती शांत आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की, ही घटना रात्री 12.30 वाजता घडली. काही मुलांनी ही घटना घडवली आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेचा निषेध केला

या प्रकरणाबाबत खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले, अमली पदार्थांच्या व्यसनींनी दहशत निर्माण केली आहे. पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचले. वरिष्ठ अधिकारी नव्हते. त्याचा तपशील तपासला पाहिजे. ही घटना निषेधार्ह आहे. मी शांत राहण्याचे आवाहन करतो. दंगलखोरांवर कारवाई केली जाईल. पोलीस आपले काम करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रामनवमीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मिश्र लोकवस्ती असलेल्या किराडपुरा येथील राम मंदिरातही तयारी सुरू होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तरुणांचा जत्था मंदिराकडे जात होता. येथूनच तणावाची पहिली ठिणगी पडली. प्राथमिक माहितीनुसार, काही तरुण मोटारसायकलवरून जात होते आणि घोषणा देत होते, त्यानंतर दोन गटात बाचाबाची झाली. नंतर वाद वाढत गेला. घोषणाबाजी होताच दोन्ही गट एकमेकांना भिडले.

महाराष्ट्र सरकार ‘नपुंसक’ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींंचा संताप, म्हणाले…

मंदिरासमोर उभ्या असलेल्या पोलिसांचे वाहन दंगलखोरांनी पेटवून दिले. जमाव ऐकायला तयार नव्हता. काही वेळातच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. मात्र लोकांनी दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्या. त्यामुळे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवली. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत संपूर्ण पोलीस बंदोबस्त रस्त्यावर होता. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube