Kasba Peth-Chinchwad Bypoll : राज ठाकरे धावले फडणवीस यांच्या मदतीला…!

Kasba Peth-Chinchwad Bypoll : राज ठाकरे धावले फडणवीस यांच्या मदतीला…!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं. तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असे पत्र आता मनसेचे (MNS) आध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांनी लिहिले आहे. त्यामुळे कसबा पेठ-चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth-Chinchwad Bypoll) शेवटच्या टप्प्यात भाजपने (BJP) राज’अस्त्र वापरत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा, मनसेचे राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube