रामदास कदम भित्रे, सगळ्या केसेस आम्ही घेतल्या; पक्षात प्रवेश करताच संजय कदम बरसले
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) भित्रे आहेत. शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. त्यांच्यावर तर एक केसही दाखल नाही. शिवसेना (Shiv Sena) म्हणजे आम्हीच गद्दार असे ते म्हणत आहेत. लोकांच्या मनात ते संभ्रम निर्माण करत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विचारांशी बांधील आहोत, असे माजी आमदार संजय (Sanjay Kadam) कदम म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश झाला. ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
वाचा : Uddhav Thackeray : आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता, तुमचा आगापिछा काय?
ते पुढे म्हणाले, की रामदास कदम नारायण राणेंवर आरोप करायचे. आता आम्ही त्यांना काय म्हणायचे.रामदास कदम कुणाचेच नाहीत. भास्कर जाधव आणि मी दोघे मिळून आता झोडपून काढू आणि विजय निश्चित मिळवू. पक्ष संकटात असताना मी पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे मला कसलीही अपेक्षा नाही, असे त्यांनी सांगितले.
सभेआधीही त्यांनी रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. रामदास कदम म्हणजे जादूटोणा असलेला बंगाली बाबा आहे. त्याचे देवमाणूस जे बॅनर लागले आहेत त्या बॅनरखाली भिकारी बसले आहेत. आणि कदम यांना मिळालेल्या खोक्यातून आमच्याही ताटात काहीतरी द्या, असे ते म्हणत आहेत. रामदास कदम हे मुंबईचे पार्सल असून त्यांना पुन्हा परत पाठवायचे हेच सध्या आमचे ध्येय असल्याचे संजय कदम म्हणाले होते.
रामदास कदम हा तात्या विंचू, त्याला पुरून उरू; भास्कर जाधवांचा घणाघात
सभेत आमदार भास्कर जाधव, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनीही रामदास कदम यांच्यासह शिंंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील सरकारवरही घणाघाती टीका केली.
https://www.youtube.com/watch?v=BI7iBWP07oI