Ladki Bahin Yojana : 26 लाख लाडक्या बहिणींना धक्का, आता मिळणार नाही दरमहा 1500 ; कारण काय?

Ladki Bahin Yojana : राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजेच लाडकी बहीण योजन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या योजने अंतर्गत पात्र

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजेच लाडकी बहीण योजन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना राज्य सरकार दहमहा 1500 रुपये देते. सध्या या योजनेच्या माध्यमांतून 2 कोटी पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या लोकप्रिय योजनेचा अनेक जण गैरफायदा घेत असल्याची माहिती समोर आली आल्याने सरकारकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे. गैरफायदा घेणाऱ्या अनेकांचे नाव या योजनेतून काढण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत या योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे आणि ई-केवायसाठी सरकारकडून 30 एप्रिलपर्यंत मुद्दत देण्यात आली आहे.

जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ (Ladki Bahin Yojana) घेत असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुमच्याकडे आता फक्त 3 दिवस शिल्लक राहिले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिल ही शेवटीची तारीख असून आतापर्यंत 26 लाख महिलांची ई-केवायसी (E-kyc) बाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेल्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर या योजनेतून मिळणारा लाभ बंद होणार आहे.

26 लाख लाडक्या बहिणींची धावपळ

या योजनेत ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिल शेवटचा दिवस असून आतापर्यंत 26 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी आहे. तर दुसरीकडे ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारकडून तीनवेळी मुद्दत वाढवण्यात आली आहे मात्र तरीही देखील 26 लाख महिलांची ई-केवायसी बाकी असल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारकडून मुद्दत वाढ देण्यात येईल का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या 26 लाख महिलांची ई-केवायसी बाकी असल्याने जर अंतिम मुद्दत संपेपर्यंत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास 26 लाख लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ थांबू शकतो अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

e-KYC कशी कराल?

सर्वप्रथम पात्र महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

होमपेजवर असलेल्या “e-KYC” बॅनरवर क्लिक केल्यावर फॉर्म ओपन होईल.

या फॉर्ममध्ये आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन “Send OTP” वर क्लिक करावे.

आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP भरून “Submit” बटणावर क्लिक करावे.

पुढे सिस्टम तपासेल की तुमची e-KYC आधीच पूर्ण झाली आहे का:
• जर पूर्ण असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा मेसेज दिसेल.
• जर पूर्ण नसेल, तर तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत आहे का ते तपासले जाईल.

जर तुम्ही पात्र असाल, तर पुढील स्टेपमध्ये पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा.

पुन्हा संमती देऊन “Send OTP” वर क्लिक करावे आणि आलेला OTP टाकून “Submit” करावे.

त्यानंतर आपला जात प्रवर्ग निवडावा आणि खालील घोषणा मान्य कराव्यात:

कुटुंबातील कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा पेन्शनधारक नाही.
कुटुंबातील फक्त 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.

सर्व माहिती मान्य करून चेकबॉक्सवर क्लिक करा आणि “Submit” दाबा.

विदर्भात एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार; विधान परिषदेसाठी बच्चू कडू घेणार मोठा निर्णय?

शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

follow us