तुम्हाला कवडीची अक्कल नाही… आरक्षणावरून हाके यांची जरांगेंवर टीका
Laxman Hake : दुसऱ्यांना पाडायची भाषा करणारे मनोज जरांगे हे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षणाबाबत काहीच करू शकत नाही. आरक्षण म्हणजे काय खिरापत वाटली का? संविधान श्रेष्ठ असून माणसाच्या हक्कांचे रक्षण करणारे संविधान अस्तित्वात आहे. मी सत्तेत जाईन आरक्षण घेईल माणसं पाडेल अशी डोक्यात हवा असेल. तुम्हाला कवडीची अक्कल नाही अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगेवर (Manoj Jarange) जोरदार टीका केली.
ओबीसी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक नगर येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या लढाई वरून हाके यांनी मनोज जारंगे यांच्यावरती कडव्या शब्दात टीका केली.
तसेच बोलताना त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) देखील निशाणा साधला. आरक्षण देणार नसेल तर आम्ही राजकारणात उतरू असा इशारा जरांगे यांनी दिला होता यावर बोलताना हाके म्हणाले की सरळ सरळ सांगा की तुम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत. पक्ष काढा आणि निवडणुका लढा मात्र ओबीसी च्या आरक्षणाच्या आडवे येऊ नका.
आम्ही आमच्या भाषणाची सुरुवात राष्ट्रीय पुरुषांची नावे घेऊन करतो तर यांच्या भाषणाची सुरुवात ही शिवीच्या माध्यमातून होती. जरांगे यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला असे चर्चा आहे. मात्र जरांगे यांनी महाविकास आघाडीचे नाही तर ओबीसीचे उमेदवारांना पराभूत करण्याचे काम त्यांनी केले. शरद पवारांच्या पक्षातल्या उमेदवारांना मतदान करा असं म्हणत होते मात्र जरांगे यांनी चंद्रकांत खैरे? यांना का पराभूत केले याचा त्यांनी उत्तर द्यावं. ज्या पक्षाकडून ओबीसींच्या जास्तीत जास्त उमेदवारांना संधी दिली जाईल.
त्यांना आमचा पाठिंबा राहील असा देखील यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. याचा जाब प्रत्येक आमदारांना विचारणार ओबीसींच्या आरक्षणाला चॅलेंज दिले जात असताना महाराष्ट्राच्या सदनात बसलेले आमदार खासदार हे गप्प का आहेत.
मोठी बातमी! जम्मू-कश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभेचे बिगूल; 4 ऑक्टोबरला मतमोजणी
याचा जाब आम्ही प्रत्येक आमदारांना विचारणार आहोत. आज जाती जातींमध्ये ते निर्माण करण्याचं काम जरांगे करत आहेत आणि त्यांना सपोर्ट हे आमदार खासदार करत आहेत असा आरोप हाके यांनी केला.