त्या तोंडात मिसरीचा बुकणा भरणाऱ्या बायकांकडेही लक्ष द्या; चिमुकल्याचं तुकाराम मुंढेंना आवाहन

Little boy appeal to Tukaram Mundhe आता एका रिलस्टार असलेल्या चिमुकल्या मुलाने त्यांना एक आवाहन केले आहेय. त्याची चर्चा सुरू आहे.

Little Boy Appeal To Tukaram Mundhe

Little boy appeal to Tukaram Mundhe for Pay attention to women who stuff Misari in mouths : राज्यामध्ये सध्या चर्चेत आहेत ते अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे जे दररोज कोणत्या ना कोणत्या कारवाईमुळे बातम्यांमध्ये झळकत असतात. त्यामध्ये त्यांनी आता पर्यंत दुधातील भेसळ, अन्न पदार्थ अन् हॉटेल्समधील अस्वच्छतेवरून कारवाई केली आहे. त्यात आता एका रिलस्टार असलेल्या चिमुकल्या मुलाने त्यांना एक आवाहन केले आहेय. त्याची चर्चा सुरू आहे.

हा मुलगा नेमकं काय म्हणाला?

तुकाराम मुंढे साहेब त्या मिसरी कडंही लक्ष द्या हो. कारण या बायका तोंडात मिसरीचा बुकणा भरतात आणि साऱ्या गावाची मापं काढतं बसतात. जरा बघा त्यांच्याकडे असं म्हणत या चिमुकल्या रिलस्टारने तुकाराम मुंढेंना मिसरी जे एक प्रकरे तंबाखूजन्य पदार्थ आहे. ते वापरण्याचं प्रमाण बायकांमध्ये आणि विशेषत: खेड्यामध्ये जास्त असतं त्यामुळे या मुलाने यावर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ namdev.patil.5015 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namdev Patil (@namdev.patil.5015)

दरम्यान 11 ऑगस्ट रोजी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी विभागनिहाय निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात आता अधिक कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी 23.4 कोटींची कमाई

भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे दुधात भेसळ करणे, बनावट पनीर तयार करणे किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये घातक पदार्थ मिसळणे हा गंभीर प्रकार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

भेसळखोरांवर मकोकाची कारवाई

दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची सूचना शिंदे यांनी केली. अशा प्रकरणांमध्ये अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याबाबतही त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.

follow us