चौदा वर्षीय मुलाने डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं, सोलापुरात एकच खळबळ…
Solapur Crime : पंढरपूरच्या माढ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. माढा तालुक्यातील आढेगाव या गावात एका १४ वर्षीय मुलाने रिव्हॉल्व्हरने (Revolver) स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. श्रीधर नष्टे (Shridhar Nashte) असं आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी! ST च्या ताफ्यात 25 हजार स्वमालकीच्या बसेस येणार, खरेदीस अजितदादांची परवानगी
श्रीधर हा आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील गणेश सदाशिव नष्टे हे सीमा सुरक्षा दलात कार्यकरत आहेत. त्यांचीच बंदूक घेऊन त्याने आत्महत्या केली. या बंदुकीचं लायन्सस जम्मू काश्मीरचं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीधर हा घटनेच्या दिवशी आजारी शाळेत गेला न जाता घरीच होता. त्याला तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होतं. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. सोमवारी दुपारी अज्ञात कारणास्तव तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला आणि रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच त्याची आई, आजोबा आणि घरातले इतर लोक धावत आले तेव्हा त्यांना श्रीधर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.
पोलिसांनी सांगितलं की, सीमा सुरक्षा दलात काम करणाऱ्या गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे. ते जेव्हा गावी येतचात, तेव्हाही त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर असते. हेच रिव्हॉल्व्हर वापरून श्रीधरने आत्महत्या. दरम्यान, या 14 वर्षीय श्रीधरच्या आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
या मुलाने का आत्महत्या केली याबाबतची अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.