लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही; थेट ऑडिओ क्लिप ऐकवत पवारांचा मोदींवर हल्ला

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही; थेट ऑडिओ क्लिप ऐकवत पवारांचा मोदींवर हल्ला

Sharad Pawar Criticize PM Modi in Madha meeting : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात माढा लोकसभा मतदारसंघ ( Madha Lok Sabha Constituency) चर्चेत आहे. त्याच माढ्यामध्ये भाजपला धक्का देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांच्या अश्वसानावरून टीका केली. त्यासाठी त्यांनी भरसभेत मोदींच्या गाजलेल्या भाषणाची क्लिप ऐकवली. तसेच मोदी यांची स्थिती म्हणजे लबाडाच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. असा टोला देखील पवार यांनी मोदी यांना लगावला आहे.

Chunkey Panday: अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यातील नातेसंबंधावर अभिनेत्याने सोडलं मौन

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदी आणि भाजपने जनतेला विविध अश्वासन दिली. त्यामध्ये महागाई कमी करणे हे त्यांचं मुख्य आश्वासन होतं. मात्र त्यांच्या सत्तेमध्ये पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस इतर जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे त्यांनी 2014 ला जनतेला आश्वासन दिल्याची भाषण तुम्हाला आठवत नसतील तर मी ते तुम्हाला ऐकवतो. असं म्हणत पवारांनी भरसभेत मोदींच्या गाजलेल्या भाषणाची क्लिप ऐकवली.

Sadabhau Khot : “पवार साहेब तुमचंही आडनाव फडणवीस असतं तर..” सदाभाऊंचा हल्लाबोल

2014 च्या या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी जनतेला महागाई कमी करण्याचं अश्वासन दिलं आहे. तसेच त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका देखील केली आहे. ते म्हणाले होते की, पंतप्रधान मनमोहनसिंग महागाईचा म उच्चारण्यास तयार नाहीत. ते अहंकारी आहेत. गरिब रडत आहे. मात्र त्यांना त्यांची काळजी नाही. असं मोदी म्हणाले होते.

यावर शरद पवार म्हणाले की, हे पंतप्रधान मोदींचे 2014 चे भाषण होतं. तेच मोदी यांनी स्वतः जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. मात्र ते आम्हाला विरोधकांना दहा वर्षात तुम्ही काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. मात्र सत्ता तुमच्या हातात असताना आम्हाला कसला जाब विचारता? शिव्या घालत आहेत. असा सवाल पवार यांनी केला आहे. त्यामुळे सध्याची मोदी यांची स्थिती म्हणजे लबाडाच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. असा टोला देखील पवार यांनी मोदी यांना लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube