Madhurimaraje: मधुरिमाराजेंनी का घेतली माघार?, घरगुती समस्या की अन्य काही; उलटसुलट चर्चांना उधाण

  • Written By: Published:
Madhurimaraje: मधुरिमाराजेंनी का घेतली माघार?, घरगुती समस्या की अन्य काही; उलटसुलट चर्चांना उधाण

Kolhapur North : विधानसभेची रणधुमाळी आता कुठे सुरू झाली असतानाच ‘कोल्हापूर उत्तर’मधून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार का घेतली, असा प्रश्‍न आता त्यांच्या (Kolhapur) कार्यकर्त्यांसह सर्वांनाच पडला आहे. घरगुती समस्या, ईगो दुखावला की, अन्य काही कारणं आहेत याची उलटसुलट चर्चा रंगली आहे.

लोकसभेत खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी मिळाली, त्यांचा विजय झाला. त्यानंतरच विधानसभेला राजघराण्यातील कोणी रिंगणात नसेल, असे वारंवार सांगितले जात होते. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतरही छत्रपती घराण्यातील व्यक्तींबाबत चर्चा नव्हती. काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, त्यातही मालोजीराजे असो किंवा मधुरिमाराजे यांनी हजेरी लावली नव्हती. त्यावेळीच यांच्यापैकी कोणी उमेदवार नसेल असे वाटत असतानाच नाट्यपूर्ण घडामोडीनंतर मधुरिमाराजे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि खासदार शाहू महाराज यांनीही त्याला संमती दिली होती.

कोल्हापूरमध्ये मधुरिमाराजेंची अचानक माघार : सतेज पाटील तोंडघशी; शाहू महाराज अन् मालोजीराजेंवरही भडकले?

तोपर्यंत उमेदवारी रद्द केल्याच्या रागातून राजेश लाटकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. लाटकर लढण्यावर ठाम राहील्याने त्यांची शाहू महाराज, मालोजीराजे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत लाटकर यांनी काही राजकीय मागण्या केल्याचे समजते. तसंच, लाटकर यांची समजूत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी काढावी, असं खासदार शाहू महाराज यांना वाटत होतं. पण, तसं काही घडलं नसल्याचा रागही छत्रपती घराण्याचा असल्याचं समजतं.

मधुरिमाराजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या गाडीतून प्रचारासाठी फिरणारे काँग्रेसचे काही माजी नगरसेवक गेल्या दोन-तीन दिवसांपासून गायब झाले होते. लाटकर यांच्या उमेदवारीला ज्यांनी जाहीर विरोध करून पत्रक काढले, त्यांचा यात समावेश होता. यातूनही छत्रपती घराणे दुखावल्याचे सांगितले जाते. त्यातूनच मधुरिमाराजे यांनी हे टोकाचं पाऊल उचलले का, असाही प्रश्‍न विचारला जात आहे. खासदार शाहू महाराज यांचे पुत्र व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतःच्या पक्षासह स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटनेला घेऊन तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे. दरम्यान, लाटकर हे सोमवारी सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube