मालाडमधील ‘त्या’ स्टुडिओंवर पडणार हातोडा ; सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मालाडमधील ‘त्या’ स्टुडिओंवर पडणार हातोडा ; सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Kirit Somaiya : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना पुरते हैराण करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीला आणखी एक दणका दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे (Aditya Shaikh) यांना लक्ष्य केले होते.

मढ-मालाड येथील एक हजार कोटींचे डझनभर अनधिकृत स्टुडीओ पाडण्याचा आदेश आज National Green Tribunal (NGT) ने दिला आहे. असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने 2021 मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडीओ बांधण्यात आले होते. आम्ही न्यायालयात गेलो. उद्यापासून स्टुडीओ तोडण्याचे काम सुरु होणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विट करत दिली.

याबाबत सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत ते म्हणतात, की मढ मालाड येथील एक हजार कोटींचे अनधिकृत डझनभर स्टुडिओ पाडण्याचे आदेश आज नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने दिले आहेत. काँग्रेसचे अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने सन 2021 मध्ये हे स्टुडिओ उभारण्यात आले होते. आम्ही न्यायालयात गेलो होतो आणि आता हे अनधिकृत स्टुडिओ तोडण्याचे काम उद्यापासून सुरू होत असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Maharashtra Budget : आम्ही गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

 

दरम्यान, मढ मालाड येथील या स्टुडिओंच्या घोटाळ्या प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडी  सरकारमधील मंत्री अस्लम शेख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची  मागणी सोमय्या यांनी सात महिन्यांपूर्वी केली होती. तसेच सरकारने मुंबई पालिकेचे अधिकारी व पर्यावरण अधिकारी यांचीही चौकशी करावी  अशी त्यांची मागणी होती. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube