Maharashtra Budget 2023 : विद्यार्थी शिक्षकांसाठीही मोठी तरतूद… मानधनात वाढ

Maharashtra Budget 2023 : विद्यार्थी शिक्षकांसाठीही मोठी तरतूद… मानधनात वाढ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात 2023-24 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आलीय. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी भरीव शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2023 : राज्यातील मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; फडणवीसांची घोषणा

5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत मिळणार असून विद्यार्थ्यांचे मानधन 1 हजार वरुन 5 हजार रुपये करण्यात आले आहे. तर 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांचे मानधन 1500 वरुन 7500 रुपये करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका जिल्हा परिषद शाळेतील आठवीपर्यंतच्या सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्यात येणार आहे.


Maharashtra Budget 2023 : शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद

त्याचबरोबर शिक्षणसेवकांच्या मानधनातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सध्या शिक्षणसेवकांना 6 हजार रुपये मानधन मिळत होते. आता शिक्षणसेवकांना 16 हजार रुपये मानधन देण्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शिक्षणसेवकांच्याही मानधनात वाढ झाली आहे.

विदर्भ आणि मराठवाडा सुजलाम-सुफलाम होणार, कसे असतील नदीजोड प्रकल्प?

माध्यमिक शिक्षणसेवकांना याआधी 8 हजार रुपये 18 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना आता 20 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 1 हजार 534 कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शैक्षणिक, शेती, अंगणवाडी या क्षेत्राबाबत मोठ्या घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्या आहेत. यामध्ये सर्वच घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube