मोदी-शाहांनी सत्तारांसह राठोडांचे पंख छाटले; बाकी तीन मंत्र्यांना दिलासा

मोदी-शाहांनी सत्तारांसह राठोडांचे पंख छाटले; बाकी तीन मंत्र्यांना दिलासा

Shivsena MLA Portfolio Change :  खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सातत्याने सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलं असून इतर महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. हे खातेवाटप करताना भाजप  व शिवसेना शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले आहे.  या खातेवाटपामुळे शिंदे गटाला दणका बसल्याचे बोलले जात आहे. याचे कारण नुकताच अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना लगोलग महत्वाची खाती देण्यात आली आहे.

तसेच काही दिवसांपासून पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शाहांच्या रडावर शिंदे गटातील पाच मंत्री असल्याने हा विस्तार रखडलेला असल्याचे सांगितले जात होते. या पाचही मंत्र्याची पदावरून गच्छंती करण्याचे तसेच नवीन मंत्र्यांना नेमण्याचे आदेश भाजप हायकमांडने दिले असल्याची चर्चा तेव्हा सुरु झाली होती. यामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, दादा भूसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत या पाच मंत्र्यांची नावे होती.

मंगलप्रभात लोढांना झटका; महिला बाल कल्याण खातं राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंकडे

या मंत्रिमंडळ विस्तारात व खातेवाटपामध्ये पाच पैकी दोन मंत्र्यांना फटका बसला आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडचे कृषी खाते काढून त्यांना अल्पसंख्यांक खाते देण्यात आले आहे. तर संजय राठोड यांच्याकडील अन्न व भेसळ खाते काढून त्यांना जलसंधारण खाते देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या रडावर असलेल्या पाच मंत्र्यांपैकी दोन मंत्र्यांना झटका बसला आहे. त्यांच्याकडील महत्वाची खाते काढून त्यांना इतर खाती देण्यात आली आहे.

‘चाणक्य अन् त्यांची कुटनीती कुटून बारीक करणार’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

राठोडांविरोधात भाजप समर्थक अनेक औषधी विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत. याशिवाय एका मुलीच्या आत्महत्याप्रकरणाने राठोड यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. असे असताना राठोड यांना ठेवणे भाजपसाठी भविष्यात त्रासदायक ठरू शकणार होते. तसेच  केंद्राच्या कृषी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात अब्दुल सत्तार फेल ठरल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या खातेवाटपात त्यांची खाती बदलण्यात आल्याची चर्चा आता रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळालेली खाती पुढिलप्रमाणे : 

अजित पवार – अर्थ
धनंजय मुंडे – कृषी
दिलीप वळसे पाटील – सहकार
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा
धर्मराव अत्राम – अन्न आणि औषध प्रशासन
अनिल भाईदास पाटील – क्रीडा
अदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube