आधी तुमच्या मुलांना गुटखा द्या, मगच…तुकाराम मुंढेंनी बॉलिवूड कलाकारांना सुनावलं!
आयएएस तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत गुटख्याची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना कडक शब्दांत सुनावलंय.
IAS Tukaram Mundhe : धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून चर्चेत असलेले तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आता गुटख्याची जाहिरातबाजी करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवर तोंडसुख घेतलंय. तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने राज्यभरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाब्यांसह अनेक आस्थांपनांवर कारवाई करण्यात आलीयं. याच कारवायांची सध्या सर्वत्र चर्चा होत असतानाच आता तुकाराम मुंढे यांनी थेट
शाहरुख खान, टायगर श्रॉफ, अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या आहेत.
एवढंच नाही तर मुंढे यांनी अशा जाहिराती हटवण्याबाबतच्याही सूचना केल्या आहेत. तुम्ही गुटख्याची जाहिरात करत असाल तर आधी तुम्ही तुम्ही त्याचे सेवन करा, तुमच्या मुलांना त्याची सवय लावा. त्यांना सेवन करु द्या, मगच त्याची सवय इतरांना लावा, या कडक शब्दांत तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीदरम्यान बॉलिवूड कलाकारांना थेट सुनावलंय.
महाराष्ट्र सरकारचा नव्या विमान कंपन्यांसोबत करार; सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी
पुढे बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, जे कोणी लोकं जाहिरात करीत आहेत. त्याची ती जबाबदारी आहे की जनतेने काय करावे आणि कशावर विश्वास ठेवावा. जर तुम्ही पान किंवा गुटख्याची जाहिरात करत असाल तर आधी तुम्ही स्वत:त्याचे सेवन करा. ते तुम्ही केले पाहिजे. तुमच्या मुलांना त्याची सवय लावा. त्यांना सेवन करू द्या. मग त्याची सवय इतरांना लावा. कोणतीही जाहिरात करणे म्हणजे त्या उत्पादनाला आपला चेहरा देणे नव्हे या शब्दांत मुंढे यांनी बॉलिवूड कलाकारांना खोचक सुनावलंय.
गेल्या काही महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा, पानमसाला, बनावट औषधे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले आहेत. या कारवायांमुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुकाराम मुंढे यांनीही स्पष्ट शब्दांत इशारा देत, लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे सांगितले आहे. यापुढील काळातही अशा गैरप्रकारांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी आणि कारवाया सुरू