महिलांसाठी गुडन्यूज.. खासगी बसचाही अर्ध्या तिकीटात प्रवास; पहा, कुणी केली घोषणा ?

महिलांसाठी गुडन्यूज.. खासगी बसचाही अर्ध्या तिकीटात प्रवास; पहा, कुणी केली घोषणा ?

गडचिरोली : राज्य सरकारने नुकतीच एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता गुढीपाडव्यानिमित्त महिलांना आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आता खासगी बसमध्येही महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनने घेतला आहे.

एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्यानंतर बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली होती. त्याचा फटका खासगी प्रवासा वाहतूकदारांना बसत होता. त्यामुळे हा निर्णय असोसिएशनने घेतल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे असोसिएशननेही स्वागत केले आहे.

वाचा : ST Bus : आजपासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार

गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्सच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले, असे असोसिएशनचे अविनाश वरगंटीवार यांनी सांगितले.

एसटी महामंडळाने बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी काही नियम तयार केले आहेत. मात्र खासगी ट्रॅव्हल्सकडे सध्या तरी अशा प्रकारचे कोणतेही नियम नाहीत. अशा प्रकारचा निर्णय राज्यातील अन्य ट्रॅव्हल्सही घेऊ शकतात. असे घडले तर एसटी महामंडळाप्रमाणेच खासगी ट्रॅव्हल्सचाही निर्णय संपूर्ण राज्यासाठी असेल.

Chitra Wagh : तिकिटात ५० टक्के सवलत, चित्रा वाघ एसटीमधून प्रवास करत म्हणतात..

दरम्यान, नवे तिकीट दर आज गुढीपाडव्यापासूनच लागू  करण्यात आले आहेत. सध्या हा निर्णय फक्त गडचिरोली चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे फक्त गडचिरोली ते चंद्रपूर या मार्गासाठीच लागू असेल. पण, या पद्धतीनेच जर राज्यातील अन्य ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी निर्णय घेतला तर महिलांसाठी आधिक फायदेशीर ठरेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube