HSC Result : प्रतिक्षा संपली, धाकधूक वाढली! उद्या जाहीर होणार बारावीच्या निकाल

SCC HSC Result

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या (२५ मे) बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजताविद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. (Maharashtra Board HSC Result Date)

HSC

HSC

पुढील वेबसाइटवर पाहता येणार निकाल :

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

https://hscresult.mkcl.org/

https://hsc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in

कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा :

यंदा फेब्रुवारी महिन्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे म्हणजे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातील १० हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला होता.

गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार :

दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल, तर जूनच्या सुरवातीस दहावीचा निकाल लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली होती. त्यानुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे ते ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तर मूळ गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयामधून मिळणार आहे.

Tags

follow us