‘आता काय दोन हजारांच्या नोटा द्या, बदलून घ्या’.. नोटबंदीच्या निर्णयावर अजितदादा संतापले

‘आता काय दोन हजारांच्या नोटा द्या, बदलून घ्या’.. नोटबंदीच्या निर्णयावर अजितदादा संतापले

Ajit Pawar on RBI Withdrawn 2000 Rs : दोन हजार रुपयांची नोट वितरणानातून मागे घेण्याचा निर्णय काल रिजर्व्ह बँकेने (RBI Withdrawn 2000 Rs) घेतला. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून कडाडून टीका होत आहे. या निर्णयावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खास शैलीत टीका केली आहे. पवार यांनी आज कोल्हापूर येथील भाषणात सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

पवार म्हणाले, मागे एकदा सरकारनं सांगितलं की 500 रुपयांची नोट बंद. काल फतवा काढला की दोन हजार रुपयांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का ? आता दोन हजारांच्या नोटा द्या आणि बदलून घ्या. आपल्या देशाने इंदिरा गांधींचा काळ पाहिला. वाजपेयींचा काळ पाहिला. मोदींच्या आधी मनमोहन सिंह पंतप्रधान होते आपण तोही काळ पाहिला. काही निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. नकली नोटा, बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर बदल करावे लागतात याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतंय याचा विचार केला पाहिजे.

असले निर्णय देशाला परवडणारे नाहीत; नोटबंदीवर राज ठाकरेंनी सुनावलं

ते पुढे म्हणाले, दोन हजारांची नोट बंद करण्याचा फतवा आहे. सारखे सारखे निर्णय बदलले जातात. मागच्यावेळी जेव्हा असे केले तेव्हा लोकांनी खूप सहन केलं. तीन महिन्यात लोकांना इतका त्रास होईल वाटत नाही. मात्र दोन हजारांची नोट बंद करण्याचं कारण काय? असा सवाल पवार यांनी केला.

असले निर्णय परवडणारे नाहीत – राज ठाकरे

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर 2000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. आता त्या नोटा पुन्हा बंद केल्या. यावर बोलतांना राज ठाकरे म्हणाले, मी नोटाबंदी झाली होती, तेव्हा एक भाषण केले होते. हा धरसोड करण्याचा एक प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती.

Congress Politics : राजकारणातील गुगली ‘या’ नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हुकली

कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. सुरवातीला नोटबंदी झाली त्यावेळी नवीन नोटा आणल्या, तर त्या 2000 रुपयांच्या नोटा एटीएममध्ये जात नव्हत्या. म्हणजेच नोटा आणताना त्या मशिनमध्ये जातात की नाही हेही पाहिलं गेलं नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, देशाला असले निर्णय परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे जमा करायचे. पुन्हा नव्या नोटा निघतील. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube