‘संभाजी भिडेला तुरुगांत कधी टाकणार?, अन्यथा आम्हाला’.. काँग्रेस नेत्याचा सरकारला इशारा

‘संभाजी भिडेला तुरुगांत कधी टाकणार?, अन्यथा आम्हाला’.. काँग्रेस नेत्याचा सरकारला इशारा

Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदु्स्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ अजूनही शांत झालेला नाही. काँग्रेस नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला टोचणारे सवाल केले आहेत.

संभाजी भिडे यांना तुरुंगात कधी टाकणार, टाकणार नसाल तर आम्हालाच त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाहीत. अशा गलिच्छ शब्दांत या नालायक माणसानं वक्तव्य केलं आहे. म्हणून त्याला असेल तिथून उचलून कोठडीत टाकावं, ही सरकारकडून अपेक्षा आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…

बहुजनांचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रपित्याचा अपमान आणि त्याही पलीकडे जाऊन जिथं स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले त्या साईबाबांचा अपमान, करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या करोडो लोकांचा अपमान या नालायक माणसानं केला आहे. यावरुनच या माणसाची लायकी आणि जागा कोठडीत आहे. या माणासावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

भिडेला सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा – चव्हाण

सत्ताधाऱ्यांचा भिडेंना छुपा पाठिंबा आहे. राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य आणि भिडेंनी अमरावतीत केलेलं वक्तव्य याची तुलना करू शकतो का. राहुल गांधींनी कुणाचं नावही घेतलेलं नव्हतं. तरीही त्यांना शिक्षा झाली. त्यांची खासदारकी गेली. राहुल गांधींच्या खटल्यावर तुम्ही इतक्या तातडीने निर्णय घेता, त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावता.

संभाजी भिडेवर कारवाई का होत नाही? काँग्रेस नेत्यानं दिलं धक्कादायक उत्तर

भिडेने महात्मा गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे, महात्मा फुले आणि शिर्डीच्या साईबाबांबद्दल जे वक्तव्य केलं. ते आपण निमूटपणे ऐकून घ्यायचं का? याचा अर्थ एकच आहे तो म्हणजे याला सत्ताधारी भाजपाचा छुपा पाठिंबा आहे. त्याला आर्थिक मदतही दिली जात आहे. त्यामुळेच त्याची संघटना चालली आहे. कशी चालली माहिती नाही. ही संघटना नोंदणीकृत नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. जर हा माणूस पैसे गोळा करतोय, वर्गण्या गोळा करतोय तर त्याची चौकशी झाली पाहिजे. हे सगळं माहिती असताना फडणवीसांचं सरकार आणि भाजप या गृहस्थाला संरक्षण देत आहेत असा माझा स्पष्ट आरोप असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube